एक्स्प्लोर

निवृत्त पोलिसाला मंदिरात राहण्याची वेळ, भूमाफियावर कारवाई सुरु

नागपूर : नागपुरातील निवृत्त पोलिस कर्मचारी बाबाराव ढोमणे यांचा प्लॉट हडपून त्यांना मंदिरात राहण्यास भाग पाडणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे. आरोपी असलेले काँग्रेसचे नगसेवक हरीश ग्वालबंसी आणि त्यांच्या 10 ते 12 साथीदारांविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगली आणि खंडणी मागण्यासारख्या गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. काय आहे प्रकरण? नागपुरात सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बाबाराव ढोमणेंनी आयुष्यभराच्या पुंजीतून घेतलेला प्लॉट काही भूमाफियांनी हडप केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तिथे झोपडपट्टी उभी झाली. त्यामुळे एखादा छोट्याशा घरात उर्वरित कुटुंबाला ठेऊन बाबाराव ढोमणे नावाचा हा वृद्ध पोलीस मंदिरात राहण्यास मजबूर झाला आहे. नागपुरातील पोलीस मुख्यालयाला लागून असलेल्या हनुमान मंदिरात बाबाराव ढोमणे दिवस काढत आहेत. याच मंदिरात 62 वर्षीय बाबाराव ढोमणे काम करत असतात. 62 वर्षांचे बाबाराव ढोमणे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. मात्र, पोलीस दलातील आयुष्यभराच्या कमाईमधून पै पै जोडून जमविलेल्या पुंजीतून घेतलेला त्यांचा प्लॉट काही भूमाफियांनी हडप केला. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर बाबाराव आज मंदिरात राहण्यास मजबूर झाले आहेत. “कुटुंबाला एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ठेवले असून तिथे जागा कमी पडत असल्याने मंदिरात राहत आहे. सकाळ- संध्याकाळ जेवायला घरी जातो आणि मग मंदिरात येऊन राहतो. अनेक वेळेला तक्रार केली मात्र काहीच झाले नाही”, असं बाबाराव ढोमणे सांगतात.      बाबाराव ढोमणे आणि इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांआधी नागपूरच्या दाभा रोड परिसरात नर्मदा हाऊसिंग सोसायटीमध्ये प्लॉट खरेदी केले होते. एक हजार पाचशे चौरस फुटाच्या प्लॉट वर टुमदार घर बांधू आणि सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासह तिथे राहू असं स्वप्न बाबाराव पाहत होते. मात्र, काही भूमाफियांनी त्या ठिकाणी कब्जा केला. आज सोसायटीच्या काही हिश्श्यावर झोपडपट्टी उभी आहे. तर उर्वरित भागात सिमेंटची भिंत उभारून प्लॉट धारकांना तिथे येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. बाबाराव ढोमणे यांचा आरोप आहे की नागपुरातून काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक हरीश ग्वालबंसी यांनीच इतरांना पुढे करत ती जागा बळकावली आहे. त्यांनीच त्या ठिकाणी भिंत बांधली आहे. त्यामुळे बाबाराव ढोमणे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंसी विरोधात प्लॉट बळकावल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिस कर्मचारी बाबाराव ढोमणे यांची व्यथा एबीपी माझाने मांडल्यानंतर प्रशासन खडाडून जागं झालं आणि पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई सुरु केली आहे.

संबंधित बातमी : भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget