Buldhana News : विनापरवानगी डीजे वाजविल्या प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर; एकाच दिवसात तब्बल 22 डीजेंवर कारवाई
विनापरवानगी डीजे वाजवत नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बुलढाणा जिल्हा पोलीस आणि परिवहन विभाग अँक्शन मोडवर आले आहे. यात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका दिवसात तब्बल 22 डीजे वर कारवाई करण्यात आलीय.
Buldhana News : सध्या लग्नसराईची धूम असल्याने त्यात अनेकजण डीजे (DJ) वाजवताना दिसत आहेत. अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होतानाचेही चित्र आहे. तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी (Buldhana Police) महत्वाच पाऊल उचलल आहे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश बुलढाणा पोलिस प्रमुख सुनील कडासणे यांनी दिले आहे. परिणामी, आतापर्यंत 22 डीजे धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एका दिवसात तब्बल 22 डीजेंवर कारवाई
हल्ली सर्वत्र लग्न सराईची धामधूम सुरू असल्याने त्यात अनेकजण डीजे वाजवित आनंद साजरा करत असतात. मात्र असे करत असताना आवश्यक असलेली पोलीस परवानगी अनेक जण घेत नसल्याचे बुलढाणा शहर पोलिसांच्या (Buldhana Police) निदर्शनात आले आहेत. परिणामी, आगामी काळात लग्नासह इतर मिरवणुकीत विनापरवाना डीजे (DJ) वाजविल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर (Buldhana News) निरिक्षकांनी दिलाय.
मागील 29 एप्रिलला बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये सर्व समाजबांधावाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णया नंतर बुलढाणा जिल्हा पोलीस आणि परिवहन विभाग अँक्शन मोडवर आले आहे. यात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका दिवसात तब्बल 22 डीजे वर कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
शासनाच्या निर्देशानुसार, 75 टक्के डेसिबल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्याचा नियम आहे. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा. मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी दिले आहे.
डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच असणार आहे. समारंभ, सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल. अशी माहितीही पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी दिली आहे.
बुलढाणा शहर पोलिसांचा मोठा निर्णय
बुलढाणा शहरात गेल्या 14 एप्रिल रोजी डीजेच्या किरकोळ वादातून एक तरूणाची निघृण हत्या करण्यात आली होती. तसेच शहरात काही ठिकाणी विनापरवाना डिजे वाजविण्यात येत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहे. डीजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत कोण काय करतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीला कुठे तरी आळा बसायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात विनापरवानगी कुठेही डिजे वाजविल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या