एक्स्प्लोर

MNS Avinash Jadhav: लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत मनसेला धक्का; बड्या नेत्यावर खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल

MNS Avinash Jadhav: सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ठाणे: देशासह राज्यभरात लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु आहे. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिलाय. तसंच याप्रकरणी क्रॉस केस घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

अविनाश जाधव काय म्हणाले?

सदर प्रकरणी अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी अविनाश जाधव म्हणाले की, एका व्यक्तीनं दूरध्वनी करुन मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवलंय, असं सांगितलं होतं. त्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तक्रारीनुसार, शैलेश जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं. यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि सहा ते सात जणांसह पोलिसांसमक्ष जैन यांचा मुलगा स्वामिल याला मारहाण केली. तसंच अविनाश जाधव यांनी तक्रारदार शैलेश जैन यांना उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन त्यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

Video: श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरेंची सभा; महायुतीचे तीन उमेदवार शिवतिर्थवर, दिला भरभरुन आशीर्वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget