एक्स्प्लोर

Police Bharti : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करा, वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना संधी देण्याची मागणी

Maharashtra News : कोरोना काळात भरती रखडल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक अनेक उमेदवार अडचणीत सापडले, यामुळे वयोमर्यादेत सूट मिळत भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Police Recruitment : राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी (Police Constable Bharti) वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलनही केलं. 

पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

मार्च 2023 मध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत. या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरात असे 10 हजारहून अधिक उमेदवार असल्याचे या मागणीपत्र नमूद करण्यात आलं आहे. कोरोना काळात भरती रखडल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक अनेक उमेदवार अडचणीत सापडले असून या उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट मिळत भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं उमेदवारांचं आंदोलन

सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार कोरोना,सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाही, यामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. परिणामी वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या आहेत.

वयोमर्यादेची अट शिपाई भरतीसाठीही लागू करण्याची मागणी

वयोमर्यादेची अट खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी दोन ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. या अध्यादेशाचा आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी या उमेदवारांमधून होत आहे. त्याच बरोबर मार्च 2024 पर्यंत वयोमर्यादेची अट शिथील करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत या उमेदवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी देण्याची मागणी

पोलिस भरतीची जाहिरात 31 डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना,ही जाहिरात फेब्रुवारीत काढण्यात आली. या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असता सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता. त्यामुळे या 2022-23 च्या भरती प्रक्रियेसाठी 2021-22 नुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
Embed widget