एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीतल्या अतिसंवेदनशील गावामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दाखल, गावकऱ्यांना दिलासा
अतिसंवेदनशील आणि माओवाद्यांच्या हत्यासत्राने हादरुन दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्हयातल्या कसनासूर गावाला मंगळवारी जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन गावकऱ्यांनी दिलासा दिला आहे.
गडचिरोली : अतिसंवेदनशील आणि माओवाद्यांच्या हत्यासत्राने हादरुन दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्हयातल्या कसनासूर गावाला मंगळवारी जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन गावकऱ्यांनी दिलासा दिला आहे.
22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगल तसेच राजाराम खांदला-नैनेर परिसरात पोलिसांच्या विशेष पथक सी-60 सोबत झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षलवादी ठार झाले होते. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ या प्रमुख व जहाल नक्षल्यांचा समावेश होता. या घटनेनंतर देशात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर देशभरात चर्चेत आलेल्या या गावाला आता नक्षलवाद्यांनी लक्ष्य करत आदीवासींचे हत्यासत्र सुरु केले आहे.
22 एप्रिलच्या चकमकीची माहिती गावातील काही लोकांनी दिली असल्याच्या कारणावरून 22 जानेवारी रोजी या गावातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे गावकरी प्रचंड दहशतीत आले आहेत. घटनेमुळे गावातील काही वृद्ध नागरिक वगळता संपूर्ण गावकऱ्यांनी आपले गाव सोडून ताडगाव येथील पोलीस मदत केंद्र गाठले. या निर्णयामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. आश्रयाला आलेल्या गावकऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व राहण्याची, सोय केली होती.
पोलीस मदत केंद्रात वीस दिवसांपासून असलेल्या गावकऱ्यांना प्रशासनाने आश्वासित केल्यानंतर गावकरी गावात परतले. दहशतीखाली असलेल्या गावाला मंगळवारी जिल्हाधिकारी शेखरसिग आणि एसपी शैलेश बलकवडे यांनी भेट दिली. विशेष म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अतिसंवेदनशील भागात पंधरा ते वीस किलोमीटर पायी प्रवास करुन हे दोन्ही अधिकारी गावात पोहोचले.
दोन्ही अधिकाऱ्यानी गावकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच न घाबरण्याचे आवाहन केले. सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना दिलासा दिला. यावेळी माओवाद्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या आदीवासींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement