एक्स्प्लोर

ब्लड बँकेच्या धर्तीवर प्लाझ्मा बँक तयार करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता ब्लड बँकेप्रमाणे प्लाझ्मा बँकही तयार करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

सांगली : कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी वरदान ठरत असल्याने लवकरच ब्लड बँकेप्रमाणे प्लाझ्मा बँक तयार केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणं बंधनकारक केल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा सोमवारी वैद्यकिय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने पार पडलेल्या या आढावा बैठकीसाठी सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाधता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळाची गरज ओळखून जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात, असे सांगून वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी, कोरोना व्यतिरीक्त इतर रूग्णांना उपचारात अडचण निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. त्याच बरोबर कोरोनाच्या बाबतीत खबरदारी म्हणून आता राज्यात प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्यावर प्लाझ्मा थेरपीची उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले असून ती परिणामकारक ठरली आहे. त्यामुळे लवकरच ब्लड बँकेच्या धर्तीवर प्लाझ्मा बँकही सुरु करण्यात येणार असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : ससून रुग्णालयात एका रुग्णावरील प्लाझ्मा थेरपी यशस्वी,प्लाझ्मा थेरपीचा कसा वापर होतो?

काय आहे प्लाझ्मा थेरपी?

  • प्लाझ्मा थेरपीत अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाझ्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं.
  • ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात.
  • अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो.

प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?

  • विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात.
  • बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात.
  • अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो.
  • अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते.
महत्त्याच्या बातम्या :  BLOG | प्लाझ्मा थेरपी वरदान ठरेल काय? प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर; आरोग्य मंत्रालयाची माहिती Plasma Therapy | पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget