एक्स्प्लोर

एक झाड लावा अन् हजार रुपये मिळवा; नांदेड मधील कंधारच्या कुटुंबाचा हरित उपक्रम

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील एका कुटुंबाने हरित उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत एक झाड लावा आणि एक हजार रुपये मिळवा, अशी योजना त्यांनी आणली आहे. यासाठी त्यांनी एक मोबाईल अॅप तयार करुन घेतेले आहे.

नांदेड : जून 2016 साली अमिताभ बच्चन याना पद्म पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आसामच्या जोरहाट येथील जादव पायेंग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पायेंग यांनी आसामच्या जोरहाट या ठिकाणी 1250 एकर जमिनीवर झाडे जंगल निर्माण केले. त्यामुळे पायेंग यांना राष्ट्रातर्फे गौरवण्यात आले होते. आता अगदी असाच काहीसा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सुरू झाला आहे.

कंधार हे राष्ट्रकूटकालीन गाव नांदेड शहर मुख्यालयापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी बसलेल्या या गावात राष्ट्रकुटांच्या काळात पाण्याच्या योजना झाल्या. त्या अजूनही जिवंत आहेत. राष्ट्रकुटांच्या काळात कंधार हे राजधानीच शहर होतं. पण अलीकडच्या काळात या तालुक्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतोय. या मातीत अनेक प्रकारची माणसे अनेक क्षेत्रात नावारूपास आली. सध्या इथल्या मातीचे श्याम मामडे हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहेत. मामडे परिवार हा पिढ्यानपिढ्यांपासून कंधारात स्थायिक आहे. सध्या या परिवारात शिवा मामडे यांचे आई वडील तीन भावंड त्यांच्या पत्नी मुलबाळ आनंदाने नांदत आहेत. 25 वर्षांपूर्वी शिवा मामडे यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आता मात्र मामडे कुटुंब अत्यंत सुखात आहे.

आपल्याला याच कंधारच्या मातीने घडवलं जगवलं आर्थिकदृष्ट्या संपन्न केलं ही भावना शिवा मामडे यांच्या मनात आहे. त्यातूनच आपण या कंधारसाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार शिवा मामडे त्यांच्या मनात आला. परिवाराशी चर्चा केल्यावर वृक्षारोपण करुया असे ठरले. मग काय शिवा मामडे यांनी धडाक्यात सुरुवात केली. शासनाने देखील शंभर कोटी वृक्ष लागवड योजना केली. त्यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या वृक्षारोपणाचा फज्जा उडू नये ही काळजी शिवा यांनी घेतली. 2017 साली कंधार शहरातील अनेक भागात त्यांनी 500 झाडे लावली. महत्वाचं म्हणजे ती झाडे जगवली. झाडे लावणे त्याला खत घालणे, त्याच्याभोवती कुंपण टाकणे, त्यांना वेळोवेळी पाणी देणे ही कामे शिवा यांनी केली. पोटच्या मुलांसारखे त्यांनी या झाडांचे संगोपन केले. त्यामुळे आता त्याची फळॆ कंधारवासियांना मिळणार आहेत.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपलं

ही झाडे शिवा यांनी देशाच्या विविध भागातून मागवली. आंब्याच्या विविध जाती, चिकू, जांभूळ, अशी झाडे लावली. या झाडांच्या रोपांची खरेदी 75 रुपये ते 150 रुपयांपर्यंत केली. उत्तरप्रदेशातील लखनौ, आंध्र प्रदेशातील राजमंद्री अशा ठिकाणांहून ही झाडे मागवली. आता लावलेली ही झाडे तीन वर्षांची झाली आहेत. 2017 साली 500 झाडे लावली. आज 2020 साली 500 झाडे जिवंत आहेत. या झाडांभोवती ज्या संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत त्यावर नंबर्स टाकण्यात आले आहेत. या नंबर्समुळे त्या झाडांची वर्तमान स्थिती शिवा यांना सहज कळते.

आता नुकतीच शिवा यांनी योजना जाहीर केली आहे. एक झाड लावा एक हजार रुपये बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे. यासाठी त्यांनी हरित कंधार नावाचे मोबाईल अॅप सुद्धा तयार करून घेतले आहे. त्यासाठी 50 हजार रुपये खर्च केले आहेत. ज्या व्यक्तीला या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्याने या अॅपवर जाऊन काही माहिती भरायची आहे. त्यानंतर शिवा मामडे यांना भेटून रोप आणि खत मोफत घेऊन जायचे आहे. ज्या ठिकाणी हे झाड लावले त्याचा अक्षांश रेखांश या अॅपमध्ये रेकॉर्ड केला जातो. झाडाचे संगोपन करुन प्रत्येक आठवड्याला त्याचा या अॅपमध्ये फोटो काढायचा आहे. हे झाड तीन वर्षे जगवल्यावर त्या व्यक्तीला एक हजार रुपये शिवा मामडे हे बक्षीस देणार आहेत. महत्वाचे म्हणजे ही झाडे तुम्ही तुमच्या घरासमोर परिसरात कुठेही लावू शकता.

मामडे यांचे कंधारमध्ये सोन्याचांदीचे दुकान आहे. कुटुंबाचा गाडा अत्यंत व्यवस्थित चालतो. वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पनातून काही हिस्सा ते या वृक्षलागवडीवर खर्च करतात. तसा त्यांचा संकल्पच आहे. आजवर त्यांनी या उपक्रमावर साधारण 10 लाख रुपये स्वतःच्या उत्पन्नातून खर्च केले आहेत. वृक्षारोपणाच्या उपक्रमासाठी ते कुणाकडूनही आर्थिक किंवा अन्य मदत घेत नाहीत. बक्षिसासाठीची रक्कमही ते स्वतःच्या खिशातून खर्च करणार आहेत.

शिवा मामडे यांनी 2017 साली फक्त 500 झाडेच लावली. वाचताना हा आकडा कदाचित छोटा वाटेलही पण 2017 ते 2020 या काळात त्यांनी या झाडांचे संपूर्ण संगोपन केले आणि फलश्रुतित आता ही झाडे मोठी झाली आहेत. आता झाडे लावण्याची आणि जगवण्याची गती वाढवण्यासाठी त्यांनी झाडे लावा बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे. खरंतर शासन देखील वृक्ष लागवडीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. पण एवढी वर्षे कोट्यवधी रुपये खर्चूनही महाराष्ट्रातील जंगल 21 टक्क्यांच्या सातत्याने खालीच येतंय. त्यामुळेच सामाजिक वनीकरण विभागाने शिवा मामडे यांचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवला तर हरित महाराष्ट्र होऊन निसर्गाची माया प्रेम मिळणे सहज शक्य आहे.

Rural News | संगमेश्वरमध्ये आरवली नदीपात्रात रसायन सोडल्याने पाणी दूषित | माझं गाव माझा जिल्हा

महत्त्वाच्या बातम्या

Accident News: ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारमधील दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारमधील दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Nagpur Kalmeshwar MIDC Blast: नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Embed widget