एक्स्प्लोर
कटिंग प्या, पेटीएम करा, चहाच्या टपरीचालकाचं हायटेक पाऊल
पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये भाजीवाल्यांप्रमाणेच चहावालेदेखील आता ग्राहकांना हायटेक सुविधा पुरवू लागलेत. सुट्ट्या पैशांअभावी चहाचा आस्वाद घेण्याचे वांदे झाले. त्यामुळे ग्राहकांची हीच अडचण ओळखून, पिंपरीत चहावाल्याने हायटेक पाऊल उचललं आहे.
भाजी घ्या, कॅशलेस पेमेंट करा, भाजीवाल्याची शक्कल
पिंपरी चिंचवडच्या सांगवीमधील लक्ष्मण कांची यांनी चहाच्या टपरीवर चक्क पेटीएमची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ना सुट्ट्या पैशाची कटकट, ना हजार-पाचशेच्या नोटेची झंजट. ग्राहकही या टपरीवर गर्दी करत आहेत.
कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
पंतप्रधानांच्या नोटबंदी निर्णयानंतर ठप्प झालेला व्यवहार चालू करण्यासाठी लक्ष्मण कांची यांनी ही शक्कल लढवली. त्यामुळं ग्राहकांचीही चांगली सोय झाली आहे.
तासा-तासाला चहाचा आस्वाद घेणाऱ्या मंडळीना रोज सुट्टे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न होता. परंतु कांची यांच्या कॅशलेस सुविधेमुळं, आता कटिंगचे ७ रुपये तर स्पेशल चहा आणि कॉफीचे १५ रुपये पेटीएमद्वारे अदा करत चहाचा आस्वाद घेता येतोय.
WhatsAppवरील चुकीचा मेसेज असा करा UnSend... पाहा ही नवी ट्रिक!
नोटबंदीनंतर दिवसाचे नियोजन ढासळलेल्या नागरिकांची सुरुवात मात्र आता लक्ष्मण कांची यांच्या चहाच्या आस्वादाने तेही विना कटकट होत आहे. आता इथून पुढं सर्वच आर्थिक गणितं विना कटकट सोडवायची असतील तर तुम्हाला हायटेक होण्याशिवाय तरी तूर्तास पर्याय नाही.
संबंधित बातम्या
तुमच्या जवळच्या ATM बाहेर रांग आहे का? इथे शोधा!
पैशांसाठी मायक्रो ATM तुमच्या मदतीला, रांगेपासून सुटका!
कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
WhatsAppवरील चुकीचा मेसेज असा करा UnSend... पाहा ही नवी ट्रिक!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement