एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात पेट्रोल प्रतिलिटर दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त
राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे.
मुंबई : इंधन दरवाढीबाबत झालेल्या चहूबाजूच्या टीकेनंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार आकारला जातो.
डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement