एक्स्प्लोर

आंबा वाहतुकीआडून लोक कोकणात दाखल; वेळ पडल्यास कठोर कारवाईचे उदय सामंतांचे आदेश

आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आधार घेत रत्नागिरी गाठणं लोकांनी पसंत केले आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. वेळ पडल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश देखील त्यांनी दिले.

रत्नागिरी : लॉकडाऊननंतर हजारोंच्या संख्येनं लोक सध्या शहरात अडकून पडले आहेत. प्रवासी वाहतूक, रेल्वे, विमानसेवा बंद असल्यानं अनेकांना आपल्या मुळगावी जाता येत नाही. काहींचे हाल देखील होत असल्याचे समोर येत आहे. पण, या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी, खबरदारी घेतली जात आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक असलेले आता आपल्या गावी दाखल होत आहेत. त्यासाठी आता अनेक शक्कल देखील लढवली जात आहे.

कोकणात येण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनी समुद्रमार्गे बोटीचा पर्याय निवडला. याची दखल घेत असा प्रवास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काहींनी तर चक्क कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरून चालत येत आपलं गाव गाठलं. तर, सातारामध्ये कामानिमित्त असलेले काही तरूण, तरूणींनी जंगलाचा रस्ता निवडत आपल्या गावची वाट धरली. शिवाय, कुणी प्रेसचा बोर्ड आपल्या कारला लावत रत्नागिरीत आले. या साऱ्या बाबी समोर आल्यानंतर आता काहींना तर चक्क आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आधार घेत रत्नागिरी गाठणं पसंत केले आहे.

असाच प्रकार आता रत्नागिरी शहरात समोर आला. पनवेल येथून निघालेल्या तिघांनी चक्क आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून रत्नागिरी गाठली. पण, पोलिसांच्या सतर्कपणामुळे हा सारा प्रकार समोर आला. रत्नागिरीत आलेल्या तिघांनी पनवेल ते रत्नागिरी असा प्रवास आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मदतीनं केला होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. शिवाय असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. वेळ पडल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश देखील त्यांनी दिले.

वाहतूकदारांना समज दिली लॉकडाऊननंतर देखील अत्यावश्यक सेवेचं निमित्त करत काही प्रमाणात रत्नागिरीकर बाहेर पडल्याचं दिसून आलं. या साऱ्यांना समजवण्यासाठी आणि एकंदरीत नियमांची अंमलबजावणी कशारितीने होत आहे, याचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत रस्त्यावर उतरले होते. पनवेलहून रत्नागिरीत तिघेजण आंबा वाहचतूक करणाऱ्या वाहनाच्या मदतीनं दाखल झाल्याचं कळताच याची दखल त्यांनी तातडीनं घेतली. शिवाय, वाहतूक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोलावून घेत घडल्या प्रकाराचा जाब विचारला. तसेच असा प्रकार पुन्हा समोर आल्यास सहन केले जाणार नाही अशा कानउघडणी देखील केली.

पोलिस मित्र यांची भूमिका महत्त्वाची रत्नागिरीमध्ये सध्या पोलिसांच्या साथीला पोलिस मित्र देखील रस्त्यावर उतरले आहेत. योग्य पास पाहिल्यानंतर नागरिकांचे वाहन पुढे सोडले जात आहेत. जवळपास 40 पोलिस मित्र सध्या सकाळी 8 ते रात्री 8 असे बारा तास काम करत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gangster-Politician Nexus: Ghaywal-Patil फोटो, 100 कोटींचा आरोप! धंगेकरांचा मोठा गौप्यस्फोट
Reservation Protests | मराठा आंदोलनानंतर आता बंजारा समाजाचा मुंबईमध्ये एल्गार
Maratha Reservation | जरांगे-भुजबळ संघर्ष तीव्र, हिंसक आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप
OBC Reservation | Praful Patel यांचे Chhagan Bhujbal यांना समर्थन, OBC हितावर लक्ष
Maratha Reservation: भुजबळांच्या भूमिकेवर Ajit Pawar नाराज, पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
Embed widget