एक्स्प्लोर
Maratha Reservation | जरांगे-भुजबळ संघर्ष तीव्र, हिंसक आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप
मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे भुजबळ 'पागल झाले, बावचळलेले आहेत, पिसळ्या कुत्र्यासारखे झाले' अशा शब्दांत टीका केली. या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी बीडमधील हिंसक आंदोलनाचा उल्लेख केला. भुजबळ म्हणाले की, मराठ्यांचे आणि छोट्या जातींचे संबंध खराब करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी बीड शहरात आमदारांची घरे जाळल्याचा, लहान मुले मरता मरता वाचल्याचा आणि अमरसिंग पंडित यांच्या घरावर दगडफेक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रकाश सोळंकी यांच्या घराला आग लावल्याचेही त्यांनी सांगितले. भुजबळ यांनी जरांगे यांच्यासोबत दारुवाले, मटकेवाले, वाळुवाले असल्याचे म्हटले. मराठा समाजात यापूर्वी शांततेने ५८ मोर्चे निघाले, पण असे विदुष्ट कधी निर्माण झाले नाही, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















