एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाथर्डीत जुगार अड्ड्यावर छापा, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर : अहमदनगरला पाथर्डीत जुगार अड्ड्यावर झालेल्या धडक कारवाईत 24 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अंदाजे सव्वा पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम, चार कार आणि बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भालगाव परिसरात हॉटेलच्या तळमजल्यावर तिरट सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई केली.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सरपंच, शिक्षकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाथर्डीत खळबळ उडाली आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केल्यानं पाथर्डी पोलीसांचं अपयश उघड झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement