एक्स्प्लोर

Kolhapur Worst Road : कोल्हापुरात 15 दिवसांमध्येच 'पॅचवर्क' उखडले; या 'दगडी' कारभाराचं करायचं तरी काय? 

Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क हाती घेण्यात आले. मलमपट्टी पॅचवर्कचा दर्जाच किती महाभयंकर आहे याचा अनुभव दररोज येत आहे.

Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क हाती घेण्यात आले. मलमपट्टी पॅचवर्कचा दर्जा किती महाभयंकर आहे याचा अनुभव दररोज येत आहे. करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या खडीने दररोज अपघाताला निमंत्रण मिळत आहे. उडणाऱ्या धुळीने डोळ्यांचे विकारही सुरु झाले आहेत. असे असतानाच सुभाष रोड ते हाॅकी स्टेडियम रोड जोडणाऱ्या चौकात महाकाय असा खड्डा पडला होता. या खड्ड्यात अवघ्या 15 दिवसांपूर्वी पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र, ते आता पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे या कामातून नेमके कोणाचे वडाप सुरु आहे आणि कोणाची उखळं पांढरी होत आहेत? असाच प्रश्न उपस्थित होतो.

संबंधित पॅचवर्कचे ठेकेदाराकडून करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. नेत्रदीप सरनोबत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, संबंधित मार्गावर ड्राय बेस घेऊन खडी मारली आहे. दोन लेअर मारून झाकून घेण्यास सांगितले आहे. ड्राय बेसवर तातडीने लेअर घ्यायला हवी, पण ते करत असताना मंजूरी नसतात, बजेट नसते त्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. 

उपायुक्तांनी पॅचवर्कची पाहणी केली की नाही?

दरम्यान, ठेकेदारांकडून तसेच महापालिकेकडून होत असलेल्या कामाची पॅचवर्क कामाची पाहणी महापालिकेतील उपायुक्तांकडून होत आहे. त्यामुळे या पॅचवर्कची पाहणी उपायुक्तांकडून झाली असेल, तर कोणत्या धर्तीवर पाहणी केली? त्यासाठी काय निकष ठरवण्यात आले होते. इंडियन रोड मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आणि बांधणीच्या निकषांची माहिती ठेकेदारांना देण्यात आली होती की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.  

ठेकेदाराच्या कामाची पाहणी केली होती की नाही? याबाबत नेत्रदीप सरनोबत यांना विचारण्यात आले असता त्यांनी केली असेल, असे मोघम उत्तर दिले. मात्र, सरनोबत यांनी टेक्निकल लोकांना नाॅन टेक्निकल काम आणि नाॅन टेक्निकल लोकाना टेक्निकल काम दिलं जात असल्याचे सांगितले. असे असेल, तर अधिकारी पाहणीची जबाबदारी का घेतात? असाही प्रश्न उपस्थित होतो. तटस्थ यंत्रणेमार्फत पाहणीचे काम का करून घेतले जात नाही? याबाबत आता विचार करण्याची गरज आहे. पॅचवर्क खराब झाल्याने ठेकेदारावर काही कारवाई होणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सरासरी 30 टक्के खड्डे गृहित धरून ते भरण्यासाठी 60 ते 70 कोटी रुपयांची गरज असल्याचे नेत्रदीप सरनोबत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget