एक्स्प्लोर
लाच मागितल्याप्रकरणी परभणीच्या मनसे शहराध्यक्षाला अटक
तपोवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दराने खाद्य पदार्थांची विक्री केले जाते. याबाबत ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत आंदोलन केलं होतं.
परभणी : रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे लाच मागितल्याप्रकरणी परभणीचा मनसे शहराध्यक्ष सचिन पाटीलला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. तर या प्रकरणी एक आरोपी पसार झाला आहे.
तपोवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दराने खाद्य पदार्थांची विक्री केले जाते. याबाबत ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत आंदोलन केलं होतं. तर अनेक तक्रारीही दाखल केल्या होत्या. मात्र यानंतर मनसेचा शहराध्यक्ष सचिन पाटीलने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे एक ते दोन लाखांची लाच मागितली होती.
याबाबत तपोवनमधील पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार सचिन पाटीलला अटक करण्यात आली तर उत्तम चव्हाण हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दोघांवर फोनवरुन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस एस दहातोंडे यांनी सचिन पाटीलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement