एक्स्प्लोर
रॉडच्या मारहाणीत पत्नी रक्तबंबाळ, घाबरलेल्या पतीचे स्वतःवरही वार
परभणीत राहणाऱ्या माऊली झरकर यांनी पत्नीला रॉडने मारहाण केली, मात्र पत्नी गंभीर जखमी झाल्याचं पाहून त्यांनी स्वतःवरही वार करुन घेतले
परभणी : पत्नीसोबत भांडण विकोपाला गेल्यामुळे रागाच्या भरात पतीने तिला रॉडने मारहाण केली. मात्र पत्नी गंभीर जखमी झाल्याचं पाहून पतीने स्वतःवरही वार केले. परभणीमध्ये हा प्रकार घडला आहे.
मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाल्या असून तिला 100 पेक्षा अधिक टाके पडले आहेत.
परभणीतील विद्यानगर भागात राहणाऱ्या झरकर कुटुंबात ही घटना घडली. व्यावसायिक असलेले माऊली झरकर हे पत्नी गीता झरकर आणि आपल्या मुलासोबत राहतात. पती-पत्नीमधे काही कारणावरुन भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की माऊली यांनी रागाच्या भरात गीता यांना रॉडनी मारहाण केली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून पती माऊली झरकर यांनी भीतीपोटी स्वतःच्या अंगावरही वार केले. यामध्ये माऊलीही गंभीर जखमी झाले आहेत. झरकर दाम्पत्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
या मारहाणीत गीता यांना शंभरपेक्षा जास्त टाके पडले आहेत. भांडणाचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement