Antilia bomb scare case | सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह आज अखेर एनआयएसमोर चौकशीसाठी हजर
सचिन वाझेला देण्यात आलेल्या महत्त्वाच्या केस संदर्भात एनआएने परमबीर सिंह यांना प्रश्न विचारले तर अँटीलीया स्फोटक प्रकरण सचिन वाझेला तपासासाठी कोणत्या आधारावर देण्यात आले याची सुद्धा माहिती एनआयएने घेतली.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (ParamBir Singh) आज एनआयए कार्यालयात सकाळी 9.30 ठोक्याला चौकशीसाठी हजर झाले. ॲन्टीलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण(Mansukh Hiren) हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये सचिन वाझे आरोपी आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) थेट परमबीर सिंह यांना रिपोर्टिंग करत होते
एनआय (NIA) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंह आणि सचिन वाझे दोघांचे वैयक्तिक संबंधांपासून ते प्रोफेशनल संबंधापर्यंत चौकशी सुरू झाली. सचिन वाझेला देण्यात आलेल्या महत्त्वाच्या केस संदर्भात एनआएने परमबीर सिंह यांना प्रश्न विचारले तर अँटीलीया स्फोटक प्रकरण सचिन वाझेला तपासासाठी कोणत्या आधारावर देण्यात आले याची सुद्धा माहिती एनआयएने घेतली.
एनआयएकडून परमबीर सिंह यांना काय विचारण्यात आलं?
- सचिन वाझे हे थेट परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते.
- अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना वाझेंने नेमकी कुठली-कुठली माहिती दिली.
- मनसुख हिरणला वाझे ओळखत होते हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का?
- वाझे ज्या गाड्यात सीपी ऑफीसमध्ये आणत होते त्या बद्दल तुम्हाला माहिती होती का?
- मुंबईमध्ये महत्वाचा केसेसचा तपास वाझेंना कुठल्या निकषांवर देण्यात आलं.
सचिन वाझेंना पोलीस दलात 16 वर्षानंतर समाविष्ट करून घेण्यामध्ये परमबीर सिंह यांची मुख्य भूमिका होती. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचा हाहाकार सुरू झाला तेव्हा पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोविड पॉझिटिव्ह येऊ लागले आणि मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली. ज्यामुळे सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्यासाठी परमबीर सिंह यांनी पाठपुरावा केला...
सचिन वाझेला ख्वाजा युनूस बनावट चकमक प्रकरणात सस्पेंड करण्यात आलं होतं. 2004 मध्ये सचिन वाझेंना सस्पेंड करण्यात आलं होतं. 16 वर्षानंतर वाझेची पोलीस दलात एन्ट्री झाली. मात्र फक्त 9 महिन्यातच वाझेला दुसऱ्यांदा सस्पेंड करण्यात आलं.
परमबीर सिंह यांच्या सोबत पूर्व एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची सुद्धा चौकशी करण्यात आली. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे आधी सहकारी होते आणि दोघांनी मिळून अनेक एन्काऊंटर केले आहेत. येणाऱ्या दिवसात मुंबई पोलिस दलातील अजून काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे वाझे संदर्भात काही गोष्टी एनआयएला जाणून घ्यायच्या होत्या ज्यासाठी एनआयए बोलावलं असल्याचं परमबीर सिंह यांनी सांगितलं. तर येणाऱ्या दिवसात परंभीर यांना Nia पुन्हा बोलवतय का आणि या चौकशीतून नेमका काय समोर येत आहेत ते पाहता महत्त्वाच असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
