पंकजा मुंडेंचा भगवान भक्ती गडावर तर भगवान गडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकरांचा मेळावा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा रविवारी भगवान भक्ती गडावर ऑनलाइन दसरा मेळावा आहे तर प्रकाश आंबेडकरांचा ऊसतोड कामगारांचा भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा आहे.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा उद्या ऑनलाइन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावरती होणार आहे. भगवानगडावर दसऱ्या दिवशी राजकीय संदेश देण्याची परंपरा होती. मात्र, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबत वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपासून भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये भगवान भक्तिगड उभा केला आहे. याच ठिकाणी दसऱ्या दिवशी पंकजा मुंडे भगवान बाबाचे दर्शन घेऊन याच ठिकाणी त्या दसरा मेळावा घेत असतात.
यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला न येता घरी राहून भगवान बाबांची पूजा करून हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा ठेवला आहे.
ऊसतोड कामगारांना किमान 21 रूपयांच्या पुढे दरवाढ मिळावी : पंकजा मुंडे
यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन प्रकाश आंबेडकर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासमोर आव्हान उभं केलं आहे.
ऊसतोड कामगारांनी आता कामासाठी निघावे : पंकजा मुंडे
ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ मिळावी म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगार संपावर आहेत. मात्र, आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन पंकजा मुंडे यांनी कामगारांना आता ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार केज आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून ठेवण्यात आला होता. त्या सत्कार समारंभामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या संपाबद्दल दरामध्ये आपली भूमिका जाहीर केली आहे.
Pankaja Munde | ऊसतोड कामगारांना किमान 21 रूपयांच्या पुढे दरवाढ मिळावी : पंकजा मुंडे