एक्स्प्लोर
विठ्ठला पाव... भाविकांची दर्शन रांग सोडून बँकेकडे धाव!

पंढरपूर: देशभरातून लाखो भाविक कार्तिकी यात्रेला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी करतात. पांडुरंगाचं रुप डोळ्यात साठविण्यासाठी अनेक तास दर्शनाच्या रांगेत ताटकळत असतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयानं कार्तिकी दशमीला चक्क पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगा मोकळ्या असल्याचं दिसून आलं. भाविकांच्या रांगा मंदिरात नाही तर पंढरपुरातील बँकासमोर दिसून आल्या. विठुरायाच्या यात्रेत नेहमीच हजारोंच्या संख्येन वाढ होत असते. पण नोटा बंद केल्याने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच विठुरायाच्या दर्शन रांगेपेक्षा बँकेसमोर मोठी गर्दी असल्याचं अनोखं चित्र पाहायला मिळालं. कार्तिकी यात्रेसाठी ४ ते ५ लाख भाविक सध्या पंढरपूरमध्ये असून नेहमीप्रमाणे मंदिर समितीने मंदिरापासून ५ किलोमीटरपर्यंत दर्शन रांगेची सोय केली होती. पण काल दिवसभर सुट्ट्या पैशाच्या शोधात भाविक भटकत असल्यानं दर्शन रांग बरीचशी खाली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्वच बँकांनी पैसे बदलून देण्यासाठी जादा काउंटर उघडल्याने भाविकांनी शहरातील विविध बँकांच्या समोर पैसे बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























