एक्स्प्लोर

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटलांचं विठूरायाला साकडं

मागील आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात आलं होतं. याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केलं, असं पाटील यांनी सांगितलं.

पंढरपूर : "मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेसाठी मोठा पाऊस दे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल," असं साकडं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विठूरायाला घातलं. कार्तिकी एकादशी महासोहळ्यातील विठूरायाची शासकीय महापूजा आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे बुद्रुक गावाच्या बाळासो आणि त्यांची पत्नी आनंदीबाई मेंगाणे याना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. कार्तिकी सोहळ्यासाठी जवळपास सहा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले असून शासकीय महापूजेनंतर पहाटे साडेतीन पासून सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली. मागील आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात आलं होतं. याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केलं, असं पाटील यांनी सांगितलं. आजवर 70 वर्षात अनेक आयोग आले मात्र मराठा समाजाला कोणीच मागास ठरवले नव्हते, मात्र आम्ही या सर्व अडचणींचा अभ्यास करुन मागास आयोगापुढे कागदपत्रे सादर केल्याने पहिल्यांदाच मराठा समाजाला मागास ठरवण्यात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर या समाजाला न्याय देण्यासाठी कितीही न्यायालयीन लढाया लढायची वेळ आली तरी आम्ही लढू, मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची तयारी केलीय ज्यामुळे ही वेळच येणार नाही असं सांगितलं. मागास आयोगाने 30 टक्के मराठा समाज मागास असल्याचं मान्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाची 50 टक्क्यांची अट ओलांडली तरी अडचण येणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळेच एवढ्या प्रयत्नानंतर आता थेट विठूरायालाही साकडे घालून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात यश यावे, अशी प्रार्थना केल्याचंही पाटील म्हणाले. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्याचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य परिवहन मंडळाने या दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचे पासही यावेळी सुपूर्द केला. मंदिर समितीला 50 लाखांची देणगी देणारे लातूर इथले बांधकाम व्यावसायिक आर के चव्हाण यांचाही सन्मान यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  गेली 25 वर्षे वारी करणारे मेंगाणे दाम्पत्य आजच्या बहुमानामुळे हरखून गेलं होतं. प्रत्येक वर्षी वारीला आल्यावर आपणाला मानाच्या वारकरी होण्याचे भाग्य लाभावे, अशी प्रार्थना हे दाम्पत्य विठूरायाला करत होतं. यंदा मात्र विठूरायाने त्यांची हाक ऐकून शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळवून दिल्याचं या दाम्पत्याने सांगितलं. दरम्यान आज पहाटे एक वाजल्यापासून पंढरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ उडाली असली तरी या भाविकांनी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला. 30 प्रकारच्या फुलांनी विठ्ठल मंदिर सजलं कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाख भाविक शहरात दाखल झाले असताना पुण्यातील राम जांभूळकर या भक्ताने जगभरातील विविध 30 प्रकारच्या फुलांनी संपूर्ण विठ्ठल मंदिर सजवलं. ही आकर्षक सजावट पाहून दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हरखून जात आहे. विठ्ठल मंदिरात अनेक वेळेला विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखांबी अशा प्रमुख भागात सजावट केली जाते, मात्र यावेळी जांभुळकर यांनी मंदिराच्या प्रवेशापासून बाहेर पडेपर्यंतच्या मंदिरातील सर्वच भागांना अतिशय कलात्मक रितीने फुलांची सजावट केली आहे. या सजावटीसाठी पुण्यातून आणलेल्या जर्बेरा, लिलियम, आर्किड, ड्रेसिना, ग्लॅडिओ, अन्चोरियम या सारख्या विदेशी फुलासोबत विविध रंगांचे गुलाब, मोगरा, शेवंती, गुलछडी, झेंडू, कलकत्ता झेंडू, अष्टर अशा देशी फुलांचा वापर करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणीसाठी बंगळुरुवरुन खास पोशाख आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गेली 40 वर्षे बंगळुरुचा एक भाविक नित्यनेमाने दरवर्षी विठूराया आणि रुक्मिणीसाठी खास पोशाख बनवून आणतो. आजही या भक्ताने कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी बंगळुरु इथून बनवून आणलेला पोशाख मंदिर समितीकडे सुपूर्द केला. एम कामराज असं या भक्ताचं नाव आहे. त्यांचं घराणं विठ्ठल भक्त आहे. देवाच्या कृपेने व्यवसायात मोठी भरभराट झाली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देवाच्या पोषाखाची सेवा सुरु केली ती आजही कायम आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देवाचे पोशाख बनवताना 7 दिवस कारागीर उपवास ठेवून हे पवित्र काम करतात. अत्यंत रेखीव हस्तकाम असलेल्या आणि सोन्या चांदीचा वापर केलेल्या कांची साड्या रुक्मिणी मातेसाठी कामराज घेऊन येतात. विठूरायाचा पोशाखही अशाच पद्धतीने बनवण्यात येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv sena Shinde camp candidate list: शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी, प्रेमलता सोनावणे शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात अपक्ष लढणार
एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला, इकडे महाराष्ट्रात 'लाडक्या बहिणी'ने बंडाचं निशाण फडकावलं
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
Maharashtra Assembly Election 2024: धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112  मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gokhale Institute  Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायमABP Majha Headlines :  8 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  23 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaCM Eknath Shinde : एकनाथ शिंदे सहकुटुंब कामाख्यादेवीच्या दर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv sena Shinde camp candidate list: शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी, प्रेमलता सोनावणे शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात अपक्ष लढणार
एकनाथ शिंदे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला, इकडे महाराष्ट्रात 'लाडक्या बहिणी'ने बंडाचं निशाण फडकावलं
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!
Maharashtra Assembly Election 2024: धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112  मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गूड न्यूज! लग्नाच्या 9 वर्षानंतर पहिल्या बाळाचं स्वागत
प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गूड न्यूज! लग्नाच्या 9 वर्षानंतर पहिल्या बाळाचं स्वागत
Deepika-Ranveer : लेकीच्या जन्मानंतर दीपिका-रणवीरची पुन्हा एकदा 'आलिशान' खरेदी, कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर ताफ्यात सामील
लेकीच्या जन्मानंतर दीपिका-रणवीरची पुन्हा एकदा 'आलिशान' खरेदी, कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर ताफ्यात सामील
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
Embed widget