एक्स्प्लोर
Advertisement
वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे जिव्या मशे यांचं निधन
ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा होता.
पालघर : लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांच पहाटे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड़ येथील निवस्थानी अखेरचा श्वास घेतला. मशे हे पद्मश्रीने सन्मानित होते.
ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा होता. डहाणू तालुक्यात गंजाड गावातल्या कलमी या आदिवासी पाड्यात १३ मार्च, १९३१ रोजी जिव्या सोमा मशे यांचा जन्म झाला. रुढी-परंपरांचा पगडा असलेल्या आणि प्रचंड मागासलेल्या आदिवासी समाजात ते वाढले. मात्र, त्याच आदिवासींच्या वारली परंपरेने मशे यांचे आयुष्य पालटले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावरील बायका लग्नसमारंभात आपल्या घराच्या भिंतींवर वारली चित्रं काढायच्या.
तारप्याभोवती फेर धरुन होणारा नाच, लग्नाचा मांडव, लग्नाचा चौक अशा असंख्य चित्रांचे मशे यांना लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. त्यामुळेच वारली चित्रं फक्त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींची प्रथा वयाच्या तेराव्या वर्षी मशे यांनी मोडली. त्यानंतर वारली चित्रकलेच्या दुनियेत मशे यांनी सुरु केलेली मुशाफिरी गेली ६६ वर्ष अव्याहतपणे सुरु आहे. भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोध मोहीम राबविली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या सोमा मशे हा अस्सल हिरा सापडला आणि मशे यांच्यासह वारली चित्र संस्कृतीचेही नशीब पालटले.
मशे आपली कला सादर करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. पारंपरिक वारली चित्रांच्या सोबत त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात मोठ्या खुबीने बसविले. या कलेने प्रभावित झाल्यानंतर मशे यांचा १९७६ साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झाला. त्यानंतर देशातल्या अनेक कला दालनांमध्ये मशे यांच्या चित्रांची प्रदर्शने भरु लागली. राज्य सरकारच्या मदतीने वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक वर्कशॉप घेतली. आपल्या परिसरातील शेकडो अदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. मशेंची दोन मुलेही या कलेत पारंगत असून त्यापैकी एक मुलगा वर्षातले तीन महिने जपानच्या म्युझियममध्येच कार्यरत असतो.
रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी मशे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. बेल्जियमच्या राणीने म्हशे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला. परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली आहे. १९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी मशे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement