एक्स्प्लोर

Palghar News : मोखड्यात गरोदर मातेची रस्त्याअभावी चार किलोमीटर झोळीतून फरफट

Palghar News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा मधील ओसरविरा (मुकुंदपाडा ) येथील एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी चार किलोमीटर डोलीतून जीवघेणा प्रवास करावा लागला.

पालघर : देश एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई ठाण्याजवळ असलेल्या पालघरमध्ये आज ही मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय.  एका बाजूला याच पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन , मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यातील गावांना जोडणारे मुख्य रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, गरोदर महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.  

 पालघर जिल्ह्यातील मोखाडा मधील ओसरविरा (मुकुंदपाडा ) येथील दुर्गा भोये या गरोदर महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. मात्र या गावाला जोडणारा रस्ता आणि दळणवळणाची सोय नसल्याने दवाखान्यात पोहचण्यासाठी तब्बल चार किलोमीटर झोळीतून पायपीट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुकुंदपाडा तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजित 25 किलोमीटरवर असून या गावाच्या तिन्ही बाजूला नदी आहे. गावात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी रस्ता नाही. या गावातील नागरिक नदी पार करून येजा करत असतात. पावसाळ्यात तर कठीणच परिस्थिती असते. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातील अनेक खेडी अजूनही स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे.

एखाद्या वृद्धाला, महिलेला आजपरपणात आणि महिलेला गरोदरपणात दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन जाणे अवघड जाते. एखाद्या व्यक्तीचा यामध्ये जीव गेल्यास या गोष्टीला प्रशासन  ज्याने वैद्यकीय सेवा दिली नाही आणि रस्ते बनवले नाही, ते जबाबदार राहणार का?  असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जत आहे.  पालघरमधील रस्ते अधिक जोखमीचे झाले आहेत. कोणतेही वाहन पावसळ्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने अक्षरश: झोळीमध्ये टाकून प्रवास करावा लागत आहे. या लोकांचे प्रश्न कधी सुटतील? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

ABP Majha Impact : अखेर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली; सामाजिक कार्यातून लोकांची मदत, पण सरकारकडून व्यवस्था नाहीच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलनSolapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Embed widget