एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर मच्छीमार ही संकटात

पालघर जिल्ह्यात रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 75 हजार हेक्टवरवर असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ,संपूर्ण भरपाई आणि कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पालघर : पालघर जिल्हा ओल्या दुष्काळाच्या छायेत गुरफटला असून, या जिल्हयातील बळीराजा आणि मच्छीमार हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने 90 टक्के शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेच होते. मात्र आत्ता ‘महा’ चक्रीवादळाच्या परिणामाने पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडच मोडून काढल आहे. एकीकडे सरकार बनविण्याचे चाळे सुरू असताना शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. सरकार कडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश जरी दिले असले तरीही हे काम धीम्या गतीने सुरू आहे. नुकसान भरपाई किंवा संपूर्ण कर्ज माफीची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे बळीराजा अडचणीत आहे. तर दुसरीकडे मच्छीमारही मोठ्या संकटात आहे. समुद्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमारीला खीळ बसली आहे.त्यामुळे माशांची आवकच पूर्णपणे बंद झाली आहे. रात्री उशिरा पालघर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून या पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी, वाडा, विक्रमगड , पालघर , मोखाडा, जव्हार या भागात रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 75 हजार हेक्टवरवर असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात पीक पूर्णपणे तयार झालं असून सध्या जिल्ह्यात भात कापणीची शेतकऱ्यांनी काम सुरू केली आहेत. महा चक्रीवादळाच्या परिणामाने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतात वाळत टाकलेला भात पाण्यात पूर्णपणे नष्ट झाले त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा हताश झाला आहे .तर गेल्या कित्येक दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झालं असून अजूनही काही भागात शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम किनारपट्टी भागातील मच्छीमार ही संकटात असून नैसर्गिक आपत्तीमुळे 2477 बोटी पूर्णपणे बंद असल्याने मच्छीमारी ठप्प आहे त्यामुळे मच्छीमार ही संकटात सापडला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget