तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास, भीतीचे वातावरण
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी वायू प्रदूषण पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरु केल्याचं दिसून आलं आहे. टाळेबंदी असल्याचा फायदा घेत प्रदूषणकारी उद्योजक बेकायदेशीरपणे विषारी वायू हवेत सोडत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात विषारी वायू मिश्रित धूर संपूर्ण गावात पसरला.
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रंचड त्रास नागरिकांना होऊ लागला. यामुळे काही नागरिकांना चक्कर येण्याच्या घटना देखील घडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी वायू प्रदूषण पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरु केल्याचं दिसून आलं आहे. टाळेबंदी असल्याचा फायदा घेत प्रदूषणकारी उद्योजक बेकायदेशीरपणे विषारी वायू हवेत सोडत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात विषारी वायू मिश्रित धूर संपूर्ण गावात पसरला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि चक्कर येण्याच्या घटना घडू लागल्याची माहिती कोलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष संखे यांनी दिली. यातच हवे पेक्षा जड असलेल्या या वायु मिश्रित धुरामुळे श्वास घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आलं. गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याचं आढळून आलं. एवढी मोठी घटना घडूनही एकही अधिकारी याठिकाणी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे फावत चालले आहे.
मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झाल्याने घाबरलेल्या नागरीकांनी रस्त्यावर येत बोईसर पोलिसांना संपर्क केल्यानंतर कोलवडे गावात पोलीस दाखल झाले. मात्र कोणता कारखाना वायू सोडतो, याची बित्तंबातमी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी याठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचा शोध घेता येत नाही. दिवसेंदिवस तारापूर धोकादायक बनत चालले असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येते. परिणामी मोठ्या गंभीर अपघाताला नागरीकांनाच सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही. यामुळे मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तर पालघरचे उपविभागीय अधिकारी तोरष्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांना या भागाची पाहणी करून माहिती घेण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Corona: एकाच वेळी तीस जणांवर अंत्यसंस्कार! बीडच्या अंबाजोगाईतील भीषण परिस्थिती
- Corona VAccination | मोफत लसीकरण करण्यास राज्य सरकार सकारात्मक, नवाब मलिक यांची माहिती
- सोलापूरच्या वाट्याचं एक थेंब पाणी इंदापूरला नेलं तर राजकीय संन्यास घेऊ : दत्तात्रय भरणे