Padma Awards: झाकीर हुसैन, सुमन कल्याणपूर, कुमारमंगलम बिर्ला यांना पद्म पुरस्कार; महाराष्ट्रातून कोणाचा सन्मान, पाहा यादी
Padma Awards: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली. तबला वादक झाकीर हुसैन, सुमन कल्याणपूर यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंतांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Padma Awards: देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची यादी (Padma Awards 2023) जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तर, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातून कोण आहेत पद्म पुरस्काराचे मानकरी?
पद्म विभूषण पुरस्कार
तबलावादक झाकीर हुसेन
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी
सुमन कल्याणपुर (कला)
कुमार मंगलम बिर्ला (उद्योग)
दीपक धार (विज्ञान-अभियांत्रिकी)
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर)
भिकू रामजी इदाते
प्रभाकर मांडे
गजानन माने
रमेश पतंगे
कुमी वाडिया
परशुराम खुणे
रविना टंडन
सहा पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री
केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय, समाजवादी पक्षाचे दिवगंत नेते मुलायम सिंह यादव, दिग्गज वास्तुविशारद बालकृष्ण दोशी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय, एस.एम. कृष्णा, श्रीनिवास वर्धन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023
पद्मभूषण पुरस्कार विजेते दीपक धार (Deepak Dhar) हे पुण्यातील Indian Institute of Science Education and Research मधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. statistical physics आणि stochastic processes यात त्यांनी संशोधन केले आहे. Boltzmann Medal पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय संशोधक आहेत.
परशुराम खोणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असून त्यांनी आतापर्यंत 800 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. परशुराम खुणे यांनी अनेक नक्षलवादी तरुणांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन कल्याणपूर यांनी गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. ची अनेक गाणी लोकप्रिय झाली असली तरी त्या कायम प्रसिद्धीपासून अलिप्ट राहिल्या आहेत. मराठी संगीतक्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहेत.