एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यार्थी ते शिक्षक, डॉक्टर ते शेतकरी, उस्मानाबादेत भव्य मोर्चा
उस्मानाबाद: नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी उस्मानाबादमध्ये मराठा समाजाचा विशाल मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्यावतीने या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
जिजाऊ चौकापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्यांचं निवेदन देऊन थांबवण्यात येणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, मजूर अशा सर्वच घटकांनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभाग घेतला आहे. कोपर्डीतल्या बलात्काराच्या दोषींना फाशी दिली जावी, या प्रमुख मागणीसोबतच इतर अनेक मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत.
मोर्चामुळे उस्मानाबादेत 800 पोलीस, 75 अधिकारी आणि एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत.
याआधीही औरंगाबादमध्ये अशाच विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यानंतर परभणी, बीड या शहरातही मोर्चा काढण्यात येणार आहे.
बोहल्यावर चढण्यापूर्वी मोर्चात सहभाग
दरम्यान आज उस्मानाबादमध्ये एक जोडपं लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मोर्चात सहभागी झालं होतं.. आणि मोर्चात आपला निषेध नोंदवल्यानंतर हे जोडपं लग्नस्थळी पोहचलं.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती.
याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अटकेत आहेत. तीघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्यांच्यावर येत्या आठवड्यात आरोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
…तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप
कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे
कोपर्डी बलात्कार : आरोपींना फाशीच होईल असा तपास करा : अजित पवारकोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवारनगर जिल्ह्यात मुलीचा विनयभंग, आरोपीला बेड्या
‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे बलात्कारांमध्ये वाढ : भाजप आमदार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाईअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement