एक्स्प्लोर

सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, भाजपचा आक्रमक पवित्रा; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराच्या मुद्यावरुन अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ करत विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. सभागृहाबाहेर आणि सभागृहातही भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर विरोधकांकडून विधानसभेचं कामकाजाला दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन महिन्यात केवळ 15 हजार शतकऱ्यांची यादी लावली असून सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिलं आहे. ठाकरे सरकारकडून महिन्याला फक्त साडेसहा हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलं आहे. या गतीने कर्जमाफी दिली तर अनेक वर्षे कर्जमाफीसाठी लागतील असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावला. आम्ही दिवसभराचे कामकाज आज बंद करतो आहे. आज भाजपचे धरणे आंदोलन सुरु होत आहे. शेतकाऱ्यांचे आणि महिलांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलन चालू ठेवणार असल्य़ाचं फडणवीसांनी सांगितलं. तसेचं आज संध्याकाळी विरोधक राज्यपालांना जाऊन भेट घेणार असल्य़ाची माहिती फडणवीसांनी दिली. Farmer Loan Waiver | या गतीने संपूर्ण कर्जमाफीला 400 महिने लागतील : देवेंद्र फडणवीस | ABP Majha दरम्यान महिला सुरक्षेवर स्थगन प्रस्ताव विरोधकांनी मांडला पण प्रचंड गोंधळातही सरकारनं कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं दिलेलं वचन पाळा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मागणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच शेतकरी कर्जमाफीच्या जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार हे सरकारने सांगण्याचं फडणवीस यांनी केलं. शेतकरी कर्जमाफीवरुन त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावर स्थगन प्रस्तावावर विचार सुरू असून प्रश्नोत्तरांचा तास चालू द्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. आत्तापर्यंत विधानसभा दोन वेळा तहकूब करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी घोषणाबाजी भाजपाकडून करण्यात आली. विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांकडून विधानसभेचं कामकाजाला दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. सुडाचं राजकारण करण्याशिवाय सरकार काम करत नाहील : दरेकर सुडाचं राजकारण करण्याशिवाय सरकार कोणतेही काम करत नसल्याची गंभीर टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. सरकारनं शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असून सरसकट कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन अद्याप पूर्म केलेलं नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या सरकारकडून सगळ्या वचनांना हडताळ फासण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. स्थगिती देण्याचं काम करत असल्याचं टीका दरेकरांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget