एक्स्प्लोर

आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक, नेमका कसा घडला प्रकार? 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

धाराशिव : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमधील साखर कारखान्यात ही ऑनलाईन फसवणूक (Online fraud ) झाल्याचा प्रकार घडला आहे. धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत 1 कोटी 10 लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.  

नेमकी कशी झाली फसवणूक?

मिळालेल्या माहितीनुसार, चोराखळी येथील धाराशिव (Dharashiv) कारखान्याचे बाबासाहेब कचरु वाडेकर यांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करायला लावत ही फसवणूक झाली आहे. कारखान्याचे एमडी अमर पाटील असल्याचे भासवत, तसेच अमर पाटील यांचा फोटो डीपी ला ठेवत फसवणूक केली आहे. कारखान्याचे एमडी अमर पाटील हे आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आहेत. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आले आहे. 

अभिजीत पाटील हे माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे पाच साखर कारखाने आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी इथं एक त्यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्यात ही घटना घडली आहे. अभिजीत पाटील यांचे बंधू अमर पाटील हे या कारखान्याचे एमडी आहेत. अमर पाटील असल्याचे भासवत  बाबासाहेब कचरु वाडेकर यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. 

कशी होत ऑनलाईन फसवणूक?

अनेकदा आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये फुकटचे पैसे आले की ते पाहून आपल्याला आनंद होतो. या आनंदात आपण इतके मग्न होतो की हे पैसे आपल्याला कुठून आले, कसे आले याचा देखील आपल्याला विसर पडतो. पण, खरंतर हीच खरी स्कॅमची सुरुवात असते. एकदा पैसे पाठवल्यानंतर फसवणूक करणारे हे लोक पैशांची मागणी करू लागतात. आपल्या बोलण्यात गुंतवून किंवा जाळ्यात अडकवून हे लोक तुमच्या बॅंकेची माहिती आणि ओटीपी चोरतात. कळत नकळत बॅंकिंग डिटेल्स देण्याची आपण जी चूक करतो ही चूक पुढे आपल्यालाच महागात पडू शकते. तुमच्या याच चुकीमुळे स्कॅम करणारे या संधीचा फायदा उचलतात. 

महत्वाच्या बातम्या:

Bhiwandi Crime News : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड अन् 17 चेक बुकसह अनेक कारनामे उघड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
Embed widget