एक्स्प्लोर

5th March In History : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना; आज इतिहासात 

On This Day In History : आजच्या दिवशी गांधी-आयर्विन करारानंतर 5 मार्च 1931 रोजी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. 

On This Day In History : इतिहासाच्यादृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. 5 मार्च ही तारीख इतिहासाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. आजच्या दिवशी गांधी-आयर्विन करारानंतर 5 मार्च 1931 रोजी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. याबरोबरच आजच्या दिवशी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेची स्थापना झाली. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं?

1783 : जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. त्याची स्थापना 5 मार्च  1783 रोजी झाली. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) चे मुख्यालय कोलकाता येथे आहे. त्याचे कार्य भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास करणे आहे. या संस्थेची भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये राज्य युनिट कार्यालये आहेत आणि लखनौ, जयपूर, नागपूर, हैदराबाद, शिलाँग आणि कोलकाता येथे सहा प्रादेशिक कार्यालये आहेत.  

1931 : गांधी-आयर्विन करारानंतर गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली 

12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचा उपयोग ब्रिटिश राजवटीविरुद्ध शस्त्र म्हणून केला. महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडी यात्रेमुळे या आंदोलनाची सुरुवात झाली. गांधी-आयर्विन करारानंतर 5 मार्च 1931 रोजी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. 

1953 :  सोव्हिएत युनियनचे सुप्रसिद्ध नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या निधनाच्या अफवा

5 मार्च 1953 रोजी सोव्हिएत युनियनचे सुप्रसिद्ध नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या निधनाच्या अफवा जगभर पसरल्या. त्यांनी 1928 मध्ये सोव्हिएत युनियनची सत्ता हस्तगत केली होती. अफवेच्या एका दिवसानंतर 6 मार्च 1953 रोजी त्यांचा मृत्यूचा मृत्यू झाला. 

1958 : अमेरिकेने फ्लोरिडाच्या केप कॅनवेरा येथून सोडलेला लष्करी उपग्रह एक्सप्लोरर 2 पृथ्वीच्या वातावरणात परतला

अमेरिकेने फ्लोरिडाच्या केप कॅनवेरा येथून सोडलेला लष्करी उपग्रह एक्सप्लोरर 2 हा 5 मार्च 1958 रोजी पृथ्वीच्या वातावरणात परतला. त्यानंतर त्याचे विघटन झाले. 

1966 :  एअरवेज कॉर्पोरेशनचे एक बोईंग 707 विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले

ब्रिटीश ओव्हरसीज एअरवेज कॉर्पोरेशनचे एक बोईंग 707 विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 124 जणांचा मृत्यू झाला.

1970 : अण्वस्त्र प्रसारबंदी करार अस्तित्वात आला

5 मार्च 1970 रोजी अण्वस्त्र प्रसारबंदी करार अस्तित्वात आला. त्यापूर्वी 24 नोव्हेंबर 1969 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि 45 देशांनी त्याला मान्यता दिली. 

1987 : इक्वेडोरमधील भूकंपात दोन हजार लोकांचा मृत्यू 

इक्वेडोरमध्ये झालेल्या एकापाठोपाठ एक भूकंपामुळे देशभरात मोठ्या नुकसान झाले. रस्ते आणि पूल कोसळले, शिवाय तेलाच्या मोठ्या पाइपलाइन फुटल्या आणि भूस्खलनामुळे अनेक गावे वाहून गेली. यात सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर 75,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

1993 :  कॅनेडियन धावपटू बेन जॉन्सनवर स्पर्धेत सहभागी होण्यावर बंदी 

कॅनेडियन धावपटू बेन जॉन्सनने बंदी घातलेल्या औषधांचे सेवन केल्यामुळे 5 मार्च 1993 रोजी त्याच्यावर अॅथलेटिक्समध्ये सहभी होण्यावर आजीवन बंदी घातली. 

1998 : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये बॉम्बस्फोट 

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 32 जण ठार झाले. तर 300 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा हात असल्याचा संशय होता. 

2010 :  इस्रोद्वारे विकसित केलेल्या रॉकेटची चाचणी 

इस्रोद्वारे विकसित केलेल्या तीन टन पेलोड क्षमतेच्या रॉकेटची आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा अंतराळ केंद्रात 5 मार्च 2010 रोजी यशस्वी चाचणी केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Phase 4 Special Report : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सुपर सिक्स लढती कोणत्या?Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget