एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

History : मराठी रंगभूमी दिन, सुएज कालव्याचा प्रश्न पेटला आणि मंगळयानाचे यशस्वी उड्डाण; आज इतिहासात

On This Day In History : सुएज क्रायसिस किंवा सुएज कालव्याचा प्रश्न ही विसाव्या शतकातील अशी घटना होती की त्याने एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटन आणि फ्रान्सच्या शक्तीला जवळपास संपवलं. 

मुंबई : नोव्हेंबर महिन्यातील आजचा दिवस हा इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी इतिहासातील दुसरे पानीपतचं युद्ध झालं. आजच्याच दिवशी पहिल्या मराठी नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं. 5 नोव्हेंबर 1914 रोजी ब्रिटन आणि फ्रान्सने पहिल्या महायुद्धात उडी घेतली. तसेच इतिहासाला कलाटणी देणाऱ्या सुएज कालव्याचा प्रश्न आजच्याच दिवशी पेटला होता. आजचा दिवस भारतासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताचे मंगळयान अवकाशात झेपावलं. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी. 

1556- पानिपतच्या दुसऱ्या युद्धात अकबराने हेमूचा पराभव केला 

पानिपतचे दुसरे युद्ध (Second Battle of Panipat) सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच हेमू आणि मुघल सम्राट अकबर यांच्यात झालं. 5 नोव्हेंबर 1556 रोजी झालेल्या या युद्धात अकबराने निर्णायक विजय प्राप्त केला आणि मुघलांची भारतावरील सत्ता अधिक बळकट केली. या युद्धाचा परिणाम असा झाला की पुढचे जवळपास 300 वर्षे देशावर मुघलांच्या सत्तेला कुणालाही आव्हान देता आलं नाही. 

1843- सीता स्वयंवर नाटकाचे सादरीकरण आणि मराठी रंगभूमी दिन 

विष्णूदास भावे यांनी 1843 साली 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.  या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन (Marathi Rnagbhumi Din) म्हणून साजरा केला जातो. 1943 पासून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. 

1914- फ्रान्स आणि ब्रिटनने तुर्कीच्या विरोधात युद्ध पुकारलं 

पहिल्या महायुद्धाच्या (World War I) दरम्यान, 5 नोव्हेंबर 1914 रोजी फ्रान्स आणि ब्रिटनने (Britain) तुर्कीच्या विरोधात युद्ध पुकारलं. त्यानंतर या युद्धाची व्याप्ती वाढली. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अशा पहिल्या महायुद्धाची सुरुवात 1 ऑगस्ट 1914 रोजी झाली. तर त्याचा शेवट हा 11 नोव्हेंबर 1918 रोजी झाला. 

ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड हा बॉझनियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला असताना, 28 जून 1914 रोजी सर्बियातील दहशतवादी संघटनेने त्याचा खून केला. त्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बियाविरोधात 28 जुलै 1914 रोजी युद्ध पुकारलं. 1 ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरोधात युद्ध पुकारलं आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पेटली. 

पहिल्या महायुद्धात जवळपास सात कोटी सैनिकांनी भाग घेतला. त्यापैकी सहा सैनिक हे युरोपियन होते. पहिल्या महायुद्धात नऊ लाखांपेक्षा जास्त सैनिक आणि सात लाख नागरिक ठार झाले.

1940- फ्रॅंकलिन रुझवेल्ट तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी 

फ्रॅंकलिन रुझवेल्ट (Franklin D. Roosevelt) 5 नोव्हेंबर 1940 रोजी सलग तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अशी कामगिरी करणारे ते एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. फ्रॅंकलिन रुझवेल्ट हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी चार वेळा निवड झाली. 1932 ते 1945 या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.

सन 1929 च्या महामंदी (Great Depression) नंतर, अतिशय खडतर काळात अमेरिकेच्या सत्तेची कमान फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांच्या हाती आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रॅंकलिन रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष होते. या काळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा संजिवनी देत जागतिक महासत्ता बनवलं. 

1956- सुएज कालव्याचा प्रश्न पेटला, ब्रिटन आणि फ्रान्सचे सैन्य इजिप्तच्या सीमेवर पोहोचलं 

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांच्या पाठिंब्यावर अरब प्रदेशात ज्यू धर्मियांच्या इस्त्रायल हा देश वसला. पण त्यामुळे अरब देशांमध्ये मात्र असंतोष पसरला. त्यानंतर युरोपियन देशांची कोंडी करण्यासाठी इजिप्तचे (Egypt) राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर (Gamal Abdel Nasser) यांनी सुएज कालव्याचं (Suez Canal Crisis) राष्ट्रीयीकरण केलं. पण त्यामुळे सुएज क्रायसिसचा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा एकदा जागतिक युद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 

सुएज कालव्याचा प्रश्न हा 29 ऑक्टोबर 1956 रोजी इस्त्राईलच्या लष्कराने इजिप्तवर केलेल्या हल्ल्याने सुरू झाला. त्याला नंतर ब्रिटन (Britain) आणि फ्रान्सने (France) साथ दिली आणि सुएज कालव्यावर कब्जा करण्याच्या उद्देशाने 5 नोव्हेंबर 1956 रोजी या दोन देशांचं लष्कर सुएज कालव्याच्या सीमेवर उतरलं. त्यानंतर रशियाने अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली. सुएज कालवा एवढ्यासाठी महत्वाचा होता कारण युरोपकडे जाणारे दोन तृतीयांश कच्चे तेल हे या कालव्याच्या माध्यमातून जायचे. सुएज कालव्याचा प्रश्न हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्तामधील शीतयुद्धातील एक महत्वाची घटना मानली जाते. 

सुएज क्रायसिस किंवा सुएज कालव्याचा प्रश्न ही विसाव्या शतकातील अशी घटना होती की त्याने एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटन आणि फ्रान्सच्या शक्तीला जवळपास संपवलं. 

2006- सद्दाम हुसेनला फाशीची शिक्षा सुनावली 

सद्दाम हुसेन (Saddam Hussein) या इराकच्या राष्ट्राध्यक्ष आणि हुकुमशहाला 5 नोव्हेंबर रोजी मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. वयाच्या 31 व्या वर्षा सद्दाम हुसेन याने जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली. 1979 मध्ये तो स्वतः राष्ट्रपती बनला. तेव्हापासून त्याने इराकवर एकहाती सत्ता कायम ठेवली. 

अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी इराकमध्ये अणवस्त्रं असल्याचा आरोप करत 2003 साली इराकवर हल्ला केला. त्यामध्ये अमेरिकेने सद्दाम हुसेनला पकडले आणि त्याच्यावर कुर्द, शिया मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडाचे आरोप ठेवून त्याला फाशी दिली. 

2013- भारताच्या मंगळयान अभियानाला सुरुवात 

भारताच्या अवकाश कार्यक्रमामध्ये शिरपेचाचा तुरा रोवणाऱ्या मिशन मंगळयान (Mars Orbiter Mission- Mangalyaan) अभिनयाला 5 नोव्हेंबर 2013 रोजी सुरुवात झाली. या दिवशी आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने हे यान झेपावले. मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम आहे. 

यासाठी PSLV C-25 या उपग्रहाच्या माध्यमातून हे यान मंगळाकडे झेपावले.  साधारणतः 25 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि 30 नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले. 24 सप्टेंबर, 2014 रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला. तसेच अशी कामगिरी करणारी इस्त्रो (ISRO) ही जगातील चौथी अंतराळ संस्था ठरली. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget