एक्स्प्लोर

20 February In History : अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम राज्य स्थापना दिवस, जागतिक सामाजिक न्याय दिवस; इतिहासात आज

On This Day In History: आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य 1987 साली स्थापन झाले. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

Today In History : अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो. म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य 1987 साली स्थापन झाले. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी 1962 साली युद्ध केले होते.

1950: देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू आणि राष्ट्रवादी नेते शरतचंद्र बोस यांची पुण्यतिथी (Sharad Chandra Bose Deth Anniversary)

शरतचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि बॅरिस्टर होते. ते सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू होते. ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि बंगाल विधानसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते.

1956 : अभिनेते अन्नू कपूर यांचा आज वाढदिवस (Annu Kapoor Birthday)

अभिनेते अन्नू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. अन्नू कपूर यांचा जन्म 20 जानेवारी 1956 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात झाला. अन्नू कपूर यांनी 1979 साली रंगमंचावर कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. 'एक रुका हुआ फैसला' या स्टेज शोमध्ये श्याम बेनेगल यांनी पहिल्यांदा त्याची दखल घेतली. मंडी या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 30 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. विकी डोनर या हिंदी चित्रपटात डॉ. चड्ढा यांची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी त्यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

1987 : मिझोराम राज्य स्थापना दिवस (Mizoram State Foundation Day)

1986 मध्ये भारतीय संसदेने भारतीय संविधानातील 53 वी घटनादुरुस्ती स्वीकारली, ज्याने 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोराम राज्य भारताचे 23 वे राज्य म्हणून निर्माण करण्यास परवानगी दिली. 1972 मध्ये केंद्रशासित प्रदेश होईपर्यंत हा आसामचा जिल्हा होता.

2009: जागतिक सामाजिक न्याय दिवस (World Day of Social Justice)

जागतिक सामाजिक न्याय दिन (WDSJ) दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. डब्ल्यूडीएसजे साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार आणि कामांना प्रोत्साहन देणे, लैंगिक समानता प्रस्थापित करणे, सर्वांसाठी सामाजिक कल्याण आणि न्याय मिळवणे या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.

2001: माजी केंद्रीय मंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांची पुण्यतिथी 

इंद्रजित गुप्ता हे भारतीय साम्यवादी नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. ते 1960 मध्ये सर्वप्रथम पश्चिम बंगाल राज्यातील नैऋत्य कलकत्ता लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्या मतदारसंघाचे त्यांनी 1967 पर्यंत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते 1967 आणि 1971 सालातील लोकसभा निवडणुकींत पश्चिम बंगाल राज्यातील अलीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 1977 सालातील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 1980 आणि 1984 सालातील  लोकसभा निवडणुकींमध्ये ते पश्चिम बंगाल राज्यातील बासीरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते 10 व्या, 11 व्या, 12 व्या आणि 13 व्या लोकसभांमध्ये सर्वांत ज्येष्ठ सदस्य होते. त्यामुळे लोकसभेची स्थापना झाल्यावर इतर सदस्यांना शपथ द्यायला त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget