Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 238 नव्या रुग्णांची नोंद
Omicron Update : राज्यात ओमायक्रॉनच्या 238 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे.
![Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 238 नव्या रुग्णांची नोंद Omicron in Maharashtra Record new 238 omicron patients in the state in a single day Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 238 नव्या रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/09/72921c075080e6befa06fbc2db98d435_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 238 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे.
राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'हा तर सांस्कृतिक दहशतवाद'; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांचा संताप तर भाजप म्हणतंय...
- Kiran Mane : राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं!सोशल मीडियावर चाहते आक्रमक
- Kiran Mane : कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसेल तर तो मुर्दाड आहे ! राजकारण दुर्लक्षित करू नका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)