(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane : कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसेल तर तो मुर्दाड आहे ! राजकारण दुर्लक्षित करू नका
Kiran Mane : अभिनेते किरण माने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
Kiran Mane : अभिनेते किरण माने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून वेगवेगळ्या विषयांवर ते मतं मांडत असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली होती.किरण माने यांनी एक राजकीय पोस्ट लिहिली होती. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली होती. अनेकांनी त्यांना धमकीही दिली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एका पोस्ट लिहीत धमकी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
किरण माने यांनी लिहिले आहे, "गड्याहो, भवताली मानवतेविरोधात गोष्टी घडतायत आणि कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसंल तर तो मुर्दाड आहे ! राजकारण दुर्लक्षित करू नका. कुणा लुंग्यासुंग्यांच्या शिवीगाळीला, ट्रोलींगला घाबरुन राजकारणावर बोलणं टाळू नका. ब्रेख्तनं लिहून ठेवलंय.. तेच इस्कटून सांगतो.. राजकारण हे आपल्या, आपल्या आईबापांच्या, आपल्या मुलाबाळांच्या जगन्याची किंमत ठरवतं. आपण खात असलेली डाळ, भात, मासे, मटन, पीठ-मीठ, चप्पलची किंमत, रुग्णालयातील बिलं, औषधांच्या किमती, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती..सगळं सगळं राजकीय निर्णयांवरनं ठरतं !! ते दुर्लक्षून कसं चालंल??? जो माणूस छाती फूगवून सांगतो, की "राजकारण लै बेकार म्हणून मी त्यावर बोलत नाय." तो माणूस मूर्ख बेअक्कल असतो.."
सध्या किरण मानेंची ही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकार मंडळींनीदेखील त्यांच्या पोस्टला पसंती दर्शवली आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेत किरण माने यांनी साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील यांची भूमिका साकारली.
संबंधित बातम्या
Bhool Bhulaiyaa 2 : Vidya Balan चे कमबॅक, 'भूल भुलैया 2' मध्ये साकारणार मंजुलिकाची भूमिका
Hrithik Roshan : ठरलं! ऋतिक रोशन 'विक्रम वेधा'चा खलनायक, 'या' दिवशी होणार पहिला लूक प्रदर्शित
Allu Arjun on Pushpa -The Rule : अल्लू अर्जुनने केला खुलासा, 'या' दिवशी सुरू होणार 'पुष्पा 2' चे चित्रीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha