Nitin Raut : तीन दिवसांपासून राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही, नितीन राऊतांचं स्पष्टीकरण
Nitin Raut : राज्यातील लोडशेडिंगबाबत बोलत असताना नितीन राऊत यांनी भाजपवर टोला लगावला.
Nitin Raut : ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एबीपी माझासोबत संवाद साधत असताना राज्यातील लोडशेडिंगबाबत सांगितलं. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, असं म्हणत नितीन राऊत यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले 'आता तीन दिवस झाले राज्यात कुठे ही लोडशेडिंग नाही. भाजपमुळे वीज कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. आम्ही त्या नफ्यात आणल्या. अपारंपरिक विजेचे सुधारित धोरण कधीही जनतेसाठी आहे. कॅबिनेटसमोर मांडळ्यात आलं आहे. उद्या (26 एप्रिल) राज्यात विजेच्या संदर्भातील महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक खास निधीसाठी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाईट दर्जाचा कोळसा आहे. मी केंद्रीय कोळसा, रेल्वे, ऊर्जा आणि पेट्रोलियम मंत्र्यांना भेटणार स्वतः आहे.'
मोहित कंभोज हल्ला प्रकरणावर नितीन राऊत म्हणाले, 'मोहित कंभोजवर हल्ला चुकीचा आम्ही समर्थन करत नाही. पण तुम्ही पण लोकांना उद्विग्न करताय का? टाळी दोन्ही हाताने वाजली आहे.' तसेच किरीट सोमय्या यांबाबत देखील नितीन राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, 'किरीट सोमेय्यांची सवय आहे. काही झालं की दिल्ली गाठतात. काय तिथे शिजतं ते माहिती नाही. यांना महापालिका हवी आहे ना मुंबईची, ती निवाडणुकांच्या माध्यमातून जिंकावी.'
सध्या देशात सुरू असलेल्या धार्मिक घटनांबाबत नितीन राऊत म्हणाले, 'महाराष्ट्र हा तसा सुसंस्कृत. पण भाजप एक उन्माद तयार करते आहे, धार्मिक उन्माद तयार करते आहे आणि सामाजिक तेढ निर्माण होतोय. याने दंगली होणार. कायदा सुव्यवस्था आहे, पण ही मंडळी एक प्रकारचे धार्मिक अंधत्व निर्माण करायचा प्रयत्न करतेय. एखादा धर्म किंवा पठण करायचे असेल तर तो तुमचा खासगी प्रश्न आहे, तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन करू शकत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट वेठीस धरले - हा राजकीय द्रोहच'
संबंधित बातम्या