(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नितीन गडकरींच्या पुढाकाराने वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून 17 हजार रेमडेसिवीरचा साठा वितरित
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील लाईफ सायन्सेसच्या 17 हजार इंजेक्शनचा स्टॉक व्हर्च्युअल उपस्थितीत वितरित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा इंजेक्शनचा साठा नागपूर व महाराष्ट्रात वितरीत केला जाणार आहे.
वर्धा : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची ही टंचाई भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर आज जेनेटेक लाईफ सायन्सेसमधून 17 हजार इंजेक्शनचं उत्पादन करण्यात आलं आहे आणि ते वितरित करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील लाईफ सायन्सेसच्या 17 हजार इंजेक्शनचा स्टॉक व्हर्च्युअल उपस्थितीत वितरित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा इंजेक्शनचा साठा नागपूर व महाराष्ट्रात वितरीत केला जाणार आहे. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून वर्ध्यातील 'जेनेटिक लाइफ सायन्सेस'मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात योग्य नियोजन करून त्याचे वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली.
नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्याने परवानगी
'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला 30 हजार वायल (कुपी) प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.
रेमडेसिवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी 'लोन लायलंस'द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करत आहे. या कंपनीमार्फत 30 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वायल प्रतिदिन उपलब्ध होणार आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानेच केंद्र सरकारने ही परवानगी दिली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Rajesh Tope on Vaccination : लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
- Mumbai Pune Corona Cases : मुंबई, पुण्याला दिलासा! आज मुंबईत 1946 तर पुण्यात 2393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- पोलीस अधिकारी पतीचे कोरोनाने निधन, कर्तव्यपरायण पत्नी निधनाच्या तिसऱ्याच दिवशी रुग्णांच्या सेवेत हजर
- Corona Vaccination: स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात पोहचली; पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार