एक्स्प्लोर

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ,  या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती?

Nitin Gadkari Felt Dizzy : यवतमाळमधील पुसदमध्ये भाषण करताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्या आधीही चार वेळा त्यांना भोवळ आल्याची घटना घडलीय. 

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींना (Nitin Gadkari) यवतमाळच्या सभेमध्ये भाषण करताना भोवळ आल्याची घटना घडली. भाषण करताना अचानक त्यांना भोवळ आल्याने त्यांना अक्षरक्ष: उचलून नेण्यात आलं. नितीन गडकरींना या आधीही अनेकदा भोवळ आल्याची घटना घडली आहे. 

गडकरींना या आधी रक्तातील साखर कमी पडल्याने भोवळ आल्याची घटना घडली होती. तर उष्माघातानेही भोवळ येण्याची शक्यता असते. नितीन गडकरींना या आधी कधी आणि कुठे भोवळ आली होती हे पाहुयात,

या आधी गडकरींनी कधी भोवळ आली होती? 

1. नोव्हेंबर 2022  मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. बंगालमधील सिलिगुडतील दागापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली. भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर तात्काल प्राथमिक उपचार करण्यात आले. 

2. डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर गडकरींना भोवळ आली. नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक झाली. 

3. 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. उष्माघाताने त्यावेळी गडकरींनी भोवळ आल्याचं बोललं जातंय. 

4. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमातही राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली होती. 

भोवळ का येते? 

भोवळ येणे किंवा चक्कर येण्याला वैद्यकीय भाषेत सिनकोप (Syncope) असं म्हटलं जातंय, त्याला फिट येणं असंही म्हटलं जातं. मेंदूला अचानक रक्तपुरवठा कमी पडला तर भोवळ येते. रक्तातील साखर कमी पडल्याने किंवा जास्त झाल्यानेही भोवळ येऊ शकते. त्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही.  

भोवळ आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर अंधार येऊ शकतो. कधीकधी अस्वस्थ वाटून हायपाय थरथरू शकतात. काहीवेळासाठी तो व्यक्ती शुद्ध हरपतो किंवा बेशुद्ध पडतो. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर लगेच तब्येत बरी होऊ शकते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget