एक्स्प्लोर
‘आम्ही पाठिंबा काढू’ याची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, नितेश राणेंचं पत्र

मुंबई: शिवसेनेवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आता एका अनोख्या पद्धतीनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारमधून आम्ही पाठिंबा काढू. अशी घोषणा करण्यात उद्धव ठाकरे यांनी विक्रम केला त्याची नोंद गिनीज बूकमध्ये नोंद व्हावी.’ अशा आशयाचं पत्र आमदार नितेश राणे यांनी लिहिलं आहे. गिनीज बुकला आपण लिहलेलं हे पत्र हाच अर्ज समजण्यात यावा असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात?
मी, नितेश राणे (आमदार, महाराष्ट्र विधानसभा) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने एका विक्रमाची नोंद व्हावी यासाठी अर्ज करत आहे. भारतीय राजकारणातील शिवसेना हा एक राजकीय पक्ष असून उद्धव ठाकरे हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष भारतातील महाराष्ट्र राज्यात सक्रिय आहे. गिनीज बूकमध्ये विक्रम नोंदवण्यात यावा अशी मी त्यांच्या वतीने विनंती करतो. ‘राज्य सरकारमधून आम्ही पाठिंबा काढू.' असं वक्तव्य त्यांनी आतापर्यंत अनेकदा केली आहे. याच घोषणेचा विक्रम हा गिनीज बूकमध्ये नोंदवण्यात यावा. माझं हे पत्रच आपण अर्ज म्हणून समजावं आणि याची नोंद घ्यावी. नितेश नारायण राणेदरम्यान, आतापर्यंत शिवसेनेनं सत्तेत बाहेर पडण्याबाबत अनेकदा वक्तव्य केलं आहे. पण शिवसेना अद्यापही भाजपबरोबर सत्तेत कायम आहे. त्यामुळेच आता अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे. संबंधित बातम्या : ...तर शिवसेना सत्तेचीही पर्वा करणार नाही: उद्धव ठाकरे
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























