एक्स्प्लोर

Nitesh Rane : ज्यांनी साधी ग्रामपंचायत लढवली नाही ते पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत आहेत, हा  2023 मधला शेवटचा जोक; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nitesh Rane On Sanjay Raut : ज्यांनी कधी साधी  ग्रामपंचायत देखील लढवली नाही ते आज पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत असेल, तर हा 2023 चा शेवटचा विनोद आहे. असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

नागपूरठाकरे गटाचे  (Thackeray Group)  खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी इंडिया आघाडीची बैठकबाबत भाष्य करत देशात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा अशी मागणी करत मोदी सरकारवर टीका केली. टीकेला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ज्यावेळी पंतप्रधान मोदीसाहेबांच्या नेतृत्वात 2014-2019 मध्ये देशात 18-19 खासदार निवडून येत होते, तेव्हा तुम्हाला या व्हीव्हीपॅट बद्दल आक्षेप घ्यावास वाटला नाही का? तेव्हा ईव्हीएममध्ये घोळ वाटला नाही का? जेव्हा खासदर निवडून येत होते तेव्हा सगळे ठिक होते. मात्र आज एक खासदार निवडून येण्याचे वांदे असतांना उगाच ईव्हीएमच्या नावावे शेबड्यासारखे रडत बासायचे. अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. हिम्मत असेल तर तुम्ही मैदानात या, ज्यांनी कधी साधी ग्रामपंचायत देखील लढवली नाही ते आज पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत असेल, तर हा 2023 चा शेवटचा विनोद आहे. असा टोला देखील नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते. 

दिघा स्टेशन, उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर कडाडून टीका करत रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. या टीकेवर देखील आमदार नितेश राणेंनी प्रतीउत्तर देत आदित्य ठाकरेंवर टिकास्त्र सोडले आहे. रेल्वेमध्ये काय घंटा वाजविण्या करीता टीसी पदाची नौकर भरती निघाली आहे का, त्यासाठी त्यांचे ते वक्तव्य असेल. आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावे हे भायखळाच्या पेंगवीनचे ऐकावे लागले म्हणजे देशाची फार चिंता करावी लागेल. असे देखील ते म्हणाले. 

हलाल प्रमाणपत्रावर बंदची मागणी 

मराठा आरक्षण विषयात सरकार फार सकारात्मक आहे. जरांगे पाटील आणि सरकारमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही कोंडी आहे ती सुटेल. मुख्यमंत्रीच्या भाषणाने हा मार्ग सुखकर झाला आहे, असा आम्हाला विश्वास आहे. हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचे काम या हलाल जिहादच्या नावाने सध्या सुरू आहे. या हलालच्या नावाने प्रमाणपत्र देण्यातून जमा होणारा पैसा देश विघातक कृत्यासाठी वापरला जातो. लव जिहादसाठी हा पैसा वापरला जातो. त्याची असंख्य उदाहरण आमच्या जवळ आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने जे हलाल बद्दलचे प्रमाणपत्र देतात त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यातील दोन संस्था या महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे या दोन संस्थावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी. असे पत्र मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे. अशी माहिती देखील नितेश राणेंनी बोलतांना दिली.

  हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे भिवंडीतील सोन्या पाटील कनेक्शन समोर, सुदर्शन घुलेचा प्लॅन कसा फसला?
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP MajhaVulture Journey : ताडोबातलं गिधाड कसं पोहोचलं तामिळनाडूत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: संतोष देशमुखांना संपवल्यानंतर सुदर्शन घुले आसऱ्यासाठी भिवंडीत सोन्या पाटलांकडे पोहोचला पण सगळा प्लॅनच फसला
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे भिवंडीतील सोन्या पाटील कनेक्शन समोर, सुदर्शन घुलेचा प्लॅन कसा फसला?
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Embed widget