(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कामं पूर्ण, पण VIP वेळेसाठी उद्घाटनं रखडली, आदित्य ठाकरेंनी लाज काढली, भाजप नेते म्हणाले, आधी स्वत:च्या अंगाला माती लावा!
रेल्वे लाईनचं घाई गडबडीत उद्घाटन केलं तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) घेतील का? असा सवाल भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा (Pravin Darekar) आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे.
नागपूर : दिघा स्टेशन (Digha Station), उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर कडाडून टीका केलीय. रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत अशी टीका त्यांनी केली.त्याानंतर आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे कधी रेल्वेने फिरले आहेत का?, रेल्वे लाईनचं घाई गडबडीत उद्घाटन केलं तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) घेतील का? असा सवाल भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा (Pravin Darekar) आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे.
दिघा स्टेशन, उरण रेल्वेलाईन व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अशा प्रकारे कुठलाही विलंब झालेला नाही. घाईगडबडीत उद्घाटन केले काही जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील का? आदित्य ठाकरे यांनी आधी स्वतः अंगावर माती लावावी. आदित्य ठाकरे कधी रेल्वेने फिरले आहेत का? असा सवाल भाजप नेते आमदार प्रविण दरेकरांनी केला आहे, राजकरणात काहीच उरले नाही म्हणून आदित्य ठाकरे असे बोलत आहेत, असेही दरेकर म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी अशी भाषा करू नये : प्रसाद लाड
भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, आदित्य ठाकरेंनी अशी भाषा करू नये. ते त्यांच्या मतदारसंघात कितीवेळा फिरले आदित्य ठाकरे किती उद्घाटनाला गेले अशी यांची जंत्री काढावी लागेल. आदित्य ठाकरे यांनी अशी भाषा करू नये.
It’s shameful what the @RailMinIndia has turned to be, more so over the past 3 years.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 20, 2023
As of today,
• Digha Station has been ready for more than 8 months, not opened for citizens only because they’re waiting for a VIP to inaugurate it.
• Uran Line also awaits opening
The…
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गेल्या तीन वर्षापासून रेल्वेमंत्री वागत आहेत ते लाजीरवाणं आहे. दिघा स्टेशन, उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत. डिलाईल रोड विस्कळीत नियोजनांमुळे लांबला आहे. गोखले पूलही रखडला आहे.
हे ही वाचा :
लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा चांगला; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल; दीड वर्षात शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटींची मदत