Malegaon Blast Case: 'एनआयए'कडून मालेगाब बाॅम्बस्फोटातील आरोपींना मृत्यूदंडाची मागणी; न्यायालय म्हणाले, 'बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण..'
मालेगाव बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 रोजी झाला होता. माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर आरोपी होते.

Malegaon Blast Case: एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूरसह सर्व सात आरोपींना निर्दोष सोडलं आहे. 17 वर्षांनंतर हा निर्णय आला आहे. न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, ज्या बाईकमध्ये स्फोट झाला तो साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होता हे सिद्ध झालेले नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला हे देखील सिद्ध होऊ शकले नाही. कट रचण्याचा कोणताही दृष्टिकोन सिद्ध झालेला नाही. मालेगाव बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 रोजी झाले होते. आरोपींमध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर यांचा समावेश आहे. मालेगाव स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 101 जण जखमी झाले होते. या स्फोटामागे हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांशी संबंधित लोकांचा हात असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. 2016 मध्ये एनआयएने आरोपपत्र दाखल केले. एनआयएकडून आरोपींना मृत्यूदंडाची मागणी करण्या आली होती. या प्रकरणात 3 तपास संस्था आणि 4 न्यायाधीश बदलले आहेत. यापूर्वी 8 मे 2025 रोजी निकाल येणार होता, परंतु नंतर तो 31 जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कोण?
बाईकचा चेसिस नंबर जप्त करण्यात आला नाही
एनआयए कोर्टाने म्हटले आहे की स्फोटानंतर पंचनामा योग्यरित्या करण्यात आला नव्हता, घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेण्यात आले नव्हते. बाईकचा चेस नंबर कधीही जप्त करण्यात आला नव्हता. साध्वी प्रज्ञा त्या बाईकच्या मालक होत्या हे सिद्ध होऊ शकले नाही.
मालेगावमध्ये स्फोट झाला होता, पण बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची नव्हती
एनआयए न्यायालयाने म्हटले की, मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, पण बाईकमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की जखमींची संख्या 101 नाही तर 95 होती. काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यात आला.
न्यायालयाने कोणती निरीक्षणे नोंदवली?
- आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा आव्हानं देण्यात आलं
- बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं
- बॉम्बस्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला
- तपासात अनेक त्रुटी होत्या सगळ्या त्रुटींचं कोर्टाकडून वाचन
- पंचनामा योग्य नव्हता
- जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत.
- दुचाकीचा चेसिस नंबर देखील जप्त करण्यात आला नाही
- प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही
- बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर कोर्टाचं समाधान नाही
- आधी लावलेला मोक्का नंतर मागे घेतल्याने यानंतर्गत सगळे जबाब निरर्थक
- UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची होती, त्यामुळे UAPA लागू होत नाही
- कर्नल प्रसाद पुरोहित विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर कोर्टाकडून सवाल
- आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही
- सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट
इतर महत्वाच्या बातम्या
























