NIA ATS Raids in Maharashtra: जालन्यातील 'तो' चामड्याचा व्यापारी एनआयएच्या कचाट्यात, पहाटे चार वाजता दरवाजा ठोठावला अन्....
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
NIA ATS Raids In Maharashtra: दहशतवादी कृत्यात समावेश असल्याचा संशय घेत महाराष्ट्रात NIA आणि ATS ने संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरुवात केली असून छत्रपती संभाजीनगर, जालन्यातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अधिकृत सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, जालन्यात पकडण्यात आलेला संशयित तरुण चामड्याचा व्यापारी असून पहाटे चार वाजल्यापासून या तरुणाची NIA कडून चौकशी करण्यात येत आहे. देशभरात ठिकठिकाणी NIA आणि ATS ने सुरु केलेल्या छाप्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून जालना शहरातील रामनगर परिसरातून एका चामड्याच्या व्यापाऱ्यालाही NIA कडून ताब्यात घेण्यात आले आहे.
सकाळी चार वाजल्यापासून सुरु चौकशी
जालना जिल्ह्यातील रामनगर चमडा परिसरात एका संशयितांची NIA कडून चौकशी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत असून चौकशी सुरु असलेला तरुण चमड्याचा व्यापारी असल्याचं समोर येतंय. सकाळी चार वाजता या तरुणाचा दरवाजा NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांनी दार ठोठावले आणि चामड्याचा हा व्यापारी दहशदवादी कृत्यात सामील असल्याच्या संशयातून NIA च्या तावडीत सापडला आहे. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई सुरु असून या तपासात नक्की काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काय कारणास्तव होतेय चौकशी
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजी नगर जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देश विघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा यात समावेश आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.
मालेगावात डॉक्टरच्या क्लिनीकवर छापा
नाशिकमधील मालेगावमध्येही NIA ने कारवाई केली असून अब्दुल्ला नगरच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकला आहे. मालेगाव शहरात दोन ठिकाणी एनआयएचे छापे पडले असून मध्यरात्रीपासून कसून चौकशी सुरु आहे.
अब्दुल्ला नगर मधील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला. यात संशयितांची मध्यरात्रीपासून कसून चौकशी सुरू आहे.
देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय
देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एटीआय आणि दहशतवाद विरोधी पथक यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांची याचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही दोन जिल्ह्यांमधून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू केला असून महाराष्ट्रातही कारवाई करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.