एक्स्प्लोर
Advertisement
पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर, अनेक ठिकाणी खांदेपालट
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमधील पालकमंत्री आज बदलण्यात आले. पालकमंत्र्यांसोबत काही सहपालकमंत्रीही नव्याने नेमण्यात आले आहेत. जळगावचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते आणि सहपालक मंत्री म्हणून महादेव जानकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर मंत्रीमंडळात नंबर दोनचे नेते म्हणून निवड करण्यात आलेल्या चंद्रकात पाटील यांच्याकडे आता खडसे यांच्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याआधी पांडूरंग फुंडकर यांच्याकडे जळगावचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्या जागी चंद्रकांत पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, जळगावचं पालकमंत्री मिळावं यासाठी गिरीश महाजनसुद्धा इच्छुक असल्याची माहीती समजते. मात्र खडसे-महाजन यांच्या वादामुळे चंद्रकांत पाटलांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
उस्मानाबाद: दिवाकर रावते (पालकमंत्री), महादेव जानक (सहपालक मंत्री)
परभणी: गुलाबराव पाटील (पालकमंत्री)
नांदेड: अर्जुन खोतकर (पालकमंत्री)
यवतमाळ: मदन येरावार (पालकमंत्री), संजय राठोड (सहपालक मंत्री)
वाशिम: संजय राठोड (पालकमंत्री) मदन येरावार (सहपालक मंत्री)
सातारा: सदाशिव खोत (सहपालक मंत्री)
सांगली: सुभाष देशमुख (पालकमंत्री)
जळगाव: चंद्रकांत पाटील (पालकमंत्री)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement