एक्स्प्लोर

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध, मात्र राष्ट्रवादी प्रत्युत्तर देणार नाही ; जितेंद्र आव्हाडांची माहिती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे. परंतु, राष्ट्रवादी याला प्रत्युत्तर देणार नाही, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

ST workers protest : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या निवास्थानी झालेल्या आंदोलनातील आंदोलक हे एसटी कर्मचारी होते का? याची चौकशी पोलीस करतील. त्यामुळे या घटनेबाबतचे सत्य लवकरच पुढे येईल. परंतु, राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता आजच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देणार नाही. 'तुम्ही शांत राहा, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना निरोप दिला आहे. त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं उलट उत्तर दिलं जाणार नाही. आम्ही या हल्ल्याचा धिक्कार करतो. परंतु, हा धिक्कार लोकशाही मार्गाने करू, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या  निवास्थानी आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत निवास्थानी घूसून चप्पल फेक केली.  या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसोबत संवाद साधत राष्ट्रवादी याला प्रत्यूत्तर देणार नाही, अशी माहिती दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "या हल्ल्याप्रकरणी कायदा आपलं काम करेल. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता याला प्रत्यूत्तर देणार नाही. शरद पवार यांनी आम्हाला तसा निरोप दिला आहे. शिवाय काही झालं तरी आपण एसटी कामगारांसोबत आहोत, असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले आहे. एसटी कर्मचारी कामावर नसताना आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती दूर करून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.  शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. असा हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही."  

अज्ञात शक्तींनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते म्हणाले, काल न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा विजय झाला म्हणून आनंद साजरा करण्यात आला. परंतु, न्यायालयाच्या निकालाला 12 तास होण्याआधीच कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. अज्ञात शक्तींनी एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवली आहेत. आम्हाला कायदा तोडून काहीच करायचे नाही. आम्ही लोकशाही माणणारे आहोत. महाराष्ट्राची जणता हे कधीच सहन करणार नाही." 

"शरद पवार यांच्या निवास्थानावर झालेला हल्ला म्हणजे महराष्ट्राच्या राजकीय संस्कृती अपमान आहे. महराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मतभेत होते परंतु, मनभेद कधीच नव्हते. गेल्या 50 वर्षांपासून शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त केले आहे. एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात नेतृत्व गेले की काय होतं हे आज जनतेने पाहिलं आहे. राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो, अशी शिकवण शरद पवार यांनी आम्हाला दिली आहे. आज त्यांच्या घरी ते स्वत:, त्यांची पत्नी आणि नात हे तिघेच घरात असताना असा क्रूर हल्ला करण्यात आला. हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

ST Workers Protest: सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या पण कर्मचारी आक्रमक

ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक

ST Workers Protest Live : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चाShaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget