Supriya sule : भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरुन सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या महिलेचा फोटो...
सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर लावण्यात आल्याने सुप्रिया सुळे चांगल्याचं कडाडल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे य़ांनी दिली आहे.
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला. त्या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं कडाडल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पोस्टर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
बॅनरवर काय लिहिलं होतं?
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवारांचा फोटोदेखील भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला होता. अजित पवारांच्या बॅनरवर "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही बॅनगरवर कोणाचंही नाव नव्हतं. दोन्ही बॅनर एकाच साईजचे आहेत. हे बॅनर लावणं हा माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर अन्याय आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.