टिपू सुलतान प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची उडी, संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच फोटो शेअर करत भाजपवर निशाणा
टिपू सुलतान प्रकरणात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी थेट संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच एक फोटो शेअर केला करत भाजपवर निशाणा साधला आहे.
![टिपू सुलतान प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची उडी, संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच फोटो शेअर करत भाजपवर निशाणा Ncp leader Jitendra Awhad criticism on BJP for tipu sultan controversy टिपू सुलतान प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची उडी, संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच फोटो शेअर करत भाजपवर निशाणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/20/49b610817887fffd5a1052a965058f38_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टिपू सुलतान प्रकरणावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईतल्या एका मैदानाचं नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून हे वादंग सुरू आहे. या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलेलं असताना आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. भाजपाच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच एक फोटो शेअर केला करत विरोधकांनाच प्रतिप्रश्न केला आहे.
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव द्यायचे की नाही? यावरून सध्या राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. एकीकडे भाजपाकडून याला जोरदार विरोध केला जात असतानाच दुसरीकडे 2013 मध्ये भाजपानेच एका रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलेलं आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो शेअर केला आहे. 'हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे खरे उत्तर. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देऊन गौरविण्यात आलं आहे. आता तुम्ही ठरवा जे संविधानात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही?' असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.
हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे खरे उत्तर
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2022
संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देवून गौरविण्यात आलंय
आता तुम्ही ठरवा जे संविधानात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही ? pic.twitter.com/IAcDcooYwq
मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आता आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील मालवणी भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचं बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)