एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा: अजित पवार

मुंबई: 'पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि पुणे या महापालिका आम्ही कशा चालवतो आहेत ते एकदा बघा. माझं मुंबईकरांना आवाहन आहे की, गेल्या 20 वर्षापासून सेना-भाजपला सत्ता दिली. आता एकदा मुंबई पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात देऊन बघा.' असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी मुंबई पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत. 'मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा' 'शिवसेना भाजप दोन्ही पक्ष सातत्याने टीका करत आहेत. दोन्ही पक्ष गेली अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यांना आताच का एकमेकांचा भ्रष्टाचार दिसतो आहे?, आम्ही पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई ही शहरं बघा कशी घडवली आहेत. आज मी 4 वाजता दक्षिण मुंबईतून निघालो आणि मालाडला 6 वाजता पोहचलो. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. इकडे कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार चालतो, गावकडची माणसं इकडे आल्यावर मत शिवसेनेला देतात आणि गावाला आल्यावर राष्ट्रवादीला मत देतात.' असं अजित पवार म्हणाले. 'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' 'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.'अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर केली आहे. अजित पवारांनी मुंबई पालिकेतील कारभारासोबतच राज्यातील कारभारावरही टीका केली. 'राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. अशावेळी सरकारनं कोर्टाकडे वेळ मागितला. बैठकीत ठराव वैगरे मांडणं वैगरे सुरु आहे. पण याप्रकरणी चालढकल सुरु आहे. त्यामुळे या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.' अशी टीका करत पवारांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा: अजित पवार 'या सरकारनं जाहिरातबाजीत खर्चाचा विक्रम मोडला असेल' राज्यात दोन वर्षे सरकारला पूर्ण होत आहेत. राज्यातील शिक्षक समाधानी नाही, शेतकरी समाधानी नाही, कायदा सुव्यस्था नाही. मेक इन महाराष्ट्र ही तर फक्त जाहीरातबाजी आहे. सरकारच्या कामगारविरोधी धोरणं यामुळे कारखाने बंद पडत आहेत. माझा तर दावा आहे की गेल्या 15 वर्षात आम्ही जेवढा खर्च जाहिरातीवर केला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं या दोन वर्षात करुन एक विक्रम रचला असेल. अशीही त्यांनी टीका केली. 'यांचेच नेते म्हणतात, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक' 'सत्तेत आल्यानंतर हे सरकार दिलेली आश्वासनं विसरुन गेले, त्यामुळे त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे. हे काही मी बोलत नाही. त्यांचेच मंत्री म्हणतात. शिवसेनेचे अनेक खासदार म्हणतात की, पूर्वीच्या सरकारमध्ये आमची कामं तरी होत होती. दुसरीकडे अनेक आमदार आणि नेत्यांचं देखील हेच म्हणणं आहे.' असा दावा अजित पवारांनी केला आहे. 'गुंड थेट 'वर्षा'वर कसे पोहचतात?' 'निवडणुकीच्या तोंडावर भाजपत गुंडांचा समावेश होतो आहे. 'वर्षा' बंगल्यावरील तीन-तीन गेट ओलांडून गुंड आत कसे जातात, पोलिसांनी कोणाला आवरावं, निव्वळ निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला जातो आहे.' अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली. 'विरोधाला विरोध करणार नाही' 'समाजात तेढ निर्माण व्हावा म्हणून काहीजण जाणूनबुजून विधानं करतात. दुसरीकडे यांचेच मंत्री ट्विटरवर नाराजी व्यक्त करतात. पण आम्ही विरोधाला विरोध करणार नाही, पण या सरकारची काम करण्याची इच्छा नाही. आता किमान उरलेल्या तीन वर्षात तरी यांनी कामं करावी.' असंही पवार म्हणाले. ajit pawar 2-compressed अजित पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे:   - नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आम्ही उत्तमरित्या चालवतो आहोत, मुंबईचा विकास करण्यात शिवसेना अपयशी: अजित पवार - कामगारविरोधी धोरण असल्याने अनेक कारखाने बंद होत आहेत: अजित पवार - मेक इन महाराष्ट्र सारख्या गोष्टी म्हणजे फक्त जाहिरातबाजी: अजित पवार - आघाडी सरकारनं 15 जाहिरातींवर जेवढा खर्च केला नसेल त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं दोन वर्षात केला आहे: अजित पवार - युती सरकारच्या दोन वर्षानंतरही जनता असमाधानी: अजित पवार - मराठा आरक्षणाबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा: अजित पवार - ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, तडीपारीचे गुन्हे आहेत अशी लोकं 'वर्षा'वर कसे पोहचतात?: अजित पवार - मराठा आरक्षणासंबंधी हायकोर्टात सरकारनेच आणखी वेळ मागितली: अजित पवार - कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी: अजित पवार - त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे: अजित पवार - सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे : अजित पवार VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Embed widget