Ajit Pawar: सिन्नरमध्ये बुलेटवर फिरत असताना अजित पवार म्हणाले, ‘बाईकवर बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय…'
Ajit Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून सिन्नर येथे अजितदादा यांनी दुचाकीवरती मागे बसून प्रवास केला.

Ajit Pawar: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली आहे. अनेक पक्ष राज्यभरात दौरे, बैठका, यात्रा करत आहेत. अशातच राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाने आपली जनसंवाद यात्रा राज्यभरात सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून सिन्नर येथे अजितदादा (Ajit Pawar) यांनी दुचाकीवरती मागे बसून प्रवास केला. अजित पवार हे बुटेलवर मागच्या सीटवर बसले होते. बुलेटवर बसूनच ते सभेस्थळी गेले.
यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना, आपण कॉलेजच्या दिवसात मोटर सायकल चालवली आहे. आता मात्र, सार्वजनिक जीवनातील सुरक्षेमुळे इतर कारणांनी दुचाकी चालवायला मिळत नाही. मी कॉलेजच्या जीवनात दुचाकी खूप चालवली आहे, असं ते यावेळी म्हणालेत. तर कॉलेजच्या जीवनात अनेक जणींना मोटरसायकलवरुन फिरवले आहे असंही यावेळी ते म्हणाले.
ही एकजूट विश्वासाची..!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 10, 2024
ही साथ जनसन्मानाची..! #जनसन्मान_यात्रा
📍सिन्नर
जनसन्मान यात्रा सिन्नर येथे दाखल झाली. कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहून दुचाकीवरून यात्रेत सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.#JanSanmanYatra pic.twitter.com/re2YK4pAt1
गाडीवर मी नियम पाळले तुम्ही पण पाळा
"मी बऱ्याच दिवसांनी गाडीवर बसलो होतो. मी मागे बसलो होतो. गाडी चालवली नाही. मी गाडी चालवली असती तर भलतेच झाले असते. हेल्मेट घातले, कायदा पाळला, लोक म्हणत होते हेल्मेट काढा. अजित पवार आहेत, लोकांना दिसलं पाहिजे. मी दिसलो नाही तरी चालेल पण कायदा पाळला पाहिजे. आम्ही लोकांना सांगतो कायदा पाळा, म्हणून आम्हीही पाळला पाहिजे, असं अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.
आम्ही राजे नाहीत, सेवक आहोत. मी 11 वर्षाचा असताना वडील वारले, मी खते वाहिली, धारा काढल्या. मी मोठ्या राजकीय पक्ष्याच्या नेत्याचा पुतण्या असलो तरीही मी कष्ट केले आहेत. भावनिक होऊ नका, देशात राज्यात घटना घडल्या, काही चुकलं तर चुका सांगा ना, चुका दुरुस्ती करणार, असं देखील यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
