एक्स्प्लोर

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन

Maratha Reservation : राज्यात ओबीसी-मराठा वाद नको असेल तर विरोधकांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. 

मुंबई: मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar)  केलं आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग असेल तर शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणीही अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मराठा आरक्षणावर त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. 

उमेश पाटील म्हणाले की, "सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने बैठक पार पडली होती. विरोधक त्या बैठकीला नव्हते. शरद पवार यांना माझा सवाल आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा कोणता मार्ग त्यांच्याकडे आहे? ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे हे त्यांनी स्पष्ट करावं."

मराठा-ओबीसी वाद नको असेल तर विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी

सध्या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी देखील स्पष्ट करावं त्यांच्याकडे असा कोणता मार्ग आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येईल असं उमेश पाटील म्हणाले. राज्यांत मराठा-ओबीसी आरक्षण वाद नको असेल तर विरोधकांनी आपली आरक्षणाच्या बाबत असलेली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन उमेश पाटील यांनी केलं. 

जितेंद्र आव्हाड म्हणालेत की आम्ही सत्तेत आलो की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग असा कोणता मार्ग त्यांच्याकडे आहे हे त्यांनी आधी स्पष्ट करावं असं उमेश पाटील म्हणाले.

तिसरी आघाडी करण्याबाबतची जी बातमी आली ती एकदम चुकीची आहे, असा कोणताही विचार पक्षात नसल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली. 

ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी मध्यस्ती करावी अशी विनंती केली आहे. 

विशाळगडवरील अतिक्रमण काढावं 

विशाळगड प्रकरणात जी बाब चुकीची आहे ती चुकीचीच आहे असं उमेश पाटील म्हणाले. गडावर अतिक्रमण केलेलं असेल तर ते काढायला हवं, मग तिथं जात पात धर्म पाहू नये. सरकार योग्य तो निर्णय घेत आहे अस मतही उमेश पाटील यांनी व्यक्त केलं. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 24 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 24 ऑगस्ट 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :24 ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 24 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
Embed widget