एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Naxal : नक्षल्यांचा सप्ताह! बंदुका हाती घेत रॅली, सोबतीला नृत्य अन् बरंच काही... Exclusive व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती 

छत्तीसगड राज्यातील (chhattisgarh sukma naxal news) सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पीएलजीए (Naxal PLGA celebration )सप्ताहाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला आहे.

Gadchiroli News:  छत्तीसगड राज्यातील (chhattisgarh sukma naxal news) सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पीएलजीए (Naxal PLGA celebration )सप्ताहाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये गणवेशधारी नक्षलवादी उपस्थित असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावकरीही सहभागी झाल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ बीजापूर आणि सुकमा या सीमावर्ती भागातील जंगलातील असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही. 

नक्षल्यांकडून 2 ते 8  डिसेंबरपर्यंत पीएलजीए सप्ताह संपूर्ण दंडकारण्यात साजरा करण्याचं आव्हान केलं होतं.  त्याच पार्श्वभूमीवर नक्षल्यानी मोठं प्रमाणात हा सप्ताह साजरा केल्याचे दिसून येत आहे. दृश्यात दोन रांगेत मोठ्या संख्येत नागरिक रांगेत नारे देत जात असतांना दिसत आहेत. तर कार्यक्रमस्थळी क्रांतीकारी गाण्यावर नाचताना नक्षली पुरुष आणि महिला दिसत आहेत, सोबत बंदूकधारी नक्षल देखील दिसत आहेत. दरम्यान नृत्य करणारे नक्षली आहेत की नागरिक याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

असे कार्यक्रम नक्षलवादी नेहमी करत असतात. ज्यात महिला दिन हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात साजरा करतात. त्यात दंडकारण्यात असलेले नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गावांतील नागरिकांना बोलावण्यात येते. या कार्यक्रमांना गावकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. 
 
ज्या भागात नक्षली कार्यक्रमाचं आयोजन करतात तो संपूर्ण भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला असतो. दुर्गम, डोंगराळ आणि जिथे पोलीस यंत्रणा सहज पोहोचू शकत नाही, अशा भागाची या कार्यक्रमांसाठी निवड केली जाते. नक्षल्यांकडून याबाबत कमालीची सतर्कता बाळगली जाते.

दुसरीकडे इतक्या मोठ्या संख्येत गावकरी कार्यक्रमात उपस्थित असतात की पोलीस यंत्रणा नक्षल्यावर गोळीबार किंवा दुसरी कार्यवाही करू शकत नाही. हे गावकरीच नक्षल्यांसाठी प्रोटेक्शनच काम करतात. त्यामुळे पोलिसांना माहिती झाली तरी ते काही करू शकत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

असे अनेक कार्यक्रम किंवा जनअदालतचे आयोजन आधी संपूर्ण दंडकारण्यात सहज होत होते. मात्र सुरक्षा बलाचा वाढता दबाव आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मोजक्या जागी असे कार्यक्रम आता होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात असे कार्यक्रम व्हायचे मात्र आता हे प्रमाण संपलं आहे. गडचिरोली पोलिसांचा वाढता दबाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यात गडचिरोली पोलिसांकडे ड्रोन, आधुनिक हत्यारे, हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक चकमकीत मोठ्या नक्षल नेत्यांपासून अनेक मोठे नक्षली मारले गेलेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget