Navneet Rana : मुख्यमंत्र्यांची सभा लाचार : नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Navneet Rana on CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील सभा लाचार होती, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे
Navneet Rana on CM Uddhav Thackeray : राज्यात गेल्या काही दिवसांपसून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे. नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी मुंबईत झालेल्या सभेवर टीका करत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा लाचार होती, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, शनिवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त औरंगाबादमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळी औरंगजेबाच्या कबरीवर मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण केलं. मुख्यमंत्र्यांनी आधी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्यांनी त्यांच्या वाक्याच्या उलटं वक्तव्य केलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायची गरज काय असा प्रश्न त्यांनी विचारला.
नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून पलटी घेतली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही बोलले नाहीत. रोजगाराबाबत कोणतीही घोषणा केली नाही.' हनुमान चालीसा पठण करणारे सध्या गायब झाले आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करावी, असं मुख्यमंत्र्याची मुंबईतील भाषणात बोलल्याचं सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.
मुख्यमंत्री हनुमान चालीसेचा विरोध करतात, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्याची लाचारी स्पष्ट दिसतेय. गदा हाती न घेता मुख्यमंत्र्यीनी हनुमानाचा अपमान केला आहे, असंही नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या