एक्स्प्लोर

Amravati Municipal Commissioner: मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन

अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर आज तेथील मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकल्याची घटना घडली.

Amravati News : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल या 12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. दरम्यान हा पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आल्याने मनपा आयुक्तांनी संबधित पुतळा रात्रीच्या सुमारास काढला. ज्यानंतर आता स्वतःला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या काहींनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाही फेकत निषेध व्यक्त केला. दरम्यान शाई फेकणारे नेमके कोण होते, हे अजून कळाले नसले तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनीही संबधितांना पाठिंबा दिला आहे.

नवनीत राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली की, ''मला आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीची बातमी समजली. हा शिवभक्त आणि शिवप्रेमींचा राग बाहेर आला असून मी या शिवभक्तांच्या पाठीशी उभी आहे. कारवाई करण्याआधी त्या प्रकरणाची पूर्ण माहिती आयुक्तांनी घ्यायला पाहिजे होती. आम्ही तीन वर्षांपासून पुतळा बसवण्याची परवानगी मागत होतो, पण न मिळाल्याने अखेर हा पुतळा बसवला. पण अर्ध्या रात्री अशाप्रकारे पुतळा हटवल्याने त्याच दिवसापासून शिवभक्तांच्या मनात राग होता. जो आज निघाला.'' 

आष्टीकर पैसे देऊन अमरावतीचे आयुक्त झाले आहेत - रवी राणा 

दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी या शाईफेक प्रकरणावर बोलताना घडलेल्या घटनेचा मी समर्थन अजिबात करत नाही. पण मनपा आयुक्तांनी शिवप्रेमींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर हे पैसे देऊन अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्तपदी आले आहेत. तसंच मागील दोन महिन्यांपासून आयुक्त तीन टक्के कमिशन घेऊन फाईल क्लियर करून देत असल्याची टीकाही आमदार रवी राणा यांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर केली आहे.

इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget